9 महिने वीज न भरणाऱ्या नवज्योत सिद्धूंकडे कोट्यावधींची संपत्ती, एक नाही 7 बँकांमध्ये खातं

नुकतीच समोर आलेल्या माहितीप्रमाणे स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांनीच 9 महिन्यापासून वीज बिल भरलेलं नाही. हे बिल 10-20 हजार रुपये नसून तब्बल 8 लाख 67 हजार 540 रुपयांचं आहे.

9 महिने वीज न भरणाऱ्या नवज्योत सिद्धूंकडे कोट्यावधींची संपत्ती, एक नाही 7 बँकांमध्ये खातं


नवी दिल्ली : पंजाबमधील वीज संकटावरुन काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नुकतीच समोर आलेल्या माहितीप्रमाणे स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांनीच 9 महिन्यापासून वीज बिल भरलेलं नाही. हे बिल 10-20 हजार रुपये नसून तब्बल 8 लाख 67 हजार 540 रुपयांचं आहे. विशेष म्हणजे सिद्धू यांच्या संपत्तीचा विचार केला तर ते कोट्याधीश आहेत. संपत्ती आणि कमाईत ते अनेक नेते आणि सेलिब्रेटिंनाही वरचढ आहेत (Know the total property net worth of Navjot Singh Sidhu who not payed electricity bill).

2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 45.90 कोटी रुपयांची घोषित केली होती. याशिवाय जवळपास 54 लाख रुपयांची देणेदारी दाखवली होती. एडीआरच्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे 4.80 लाख रुपयांची रोख रक्कम होती.

कोणत्या बँकांमध्ये खाती

नवजोत सिंग सिद्धू यांचे देशातील 7 मोठ्या बँकांमध्ये खाती आहेत. यात एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, ओबीसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक आणि स्टेट बँक ऑफ पटियाला या बँकांचा समावेश आहे. नवजोत सिंग सिद्धूंच्या या खात्यांमध्ये जवळपास 1 कोटी 84 लाख 54 हजार 497 रुपये रक्कम जमा आहे.

कोट्यावधींच्या गाड्या

नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडे जवळपास 1.56 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. यात टोटोटा लँज क्रूजर, मिनी कूपर, फार्चुनर सारख्या गाड्यांचा समावेश आहे. सोन्याचं बोलायचं झालं तर गोल्ड रिंग, ज्वॅलरी आणि घड्याळांमध्ये सिद्धू यांनी जवळपास 95 लाख रुपये गुंतवणूक केलीय.

हेही वाचा :

‘अलविदा! माझी वेळ संपलीय’; खुर्चीत बसताच शेतकरी नेत्याचा मृत्यू

पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले

‘मी पैशांसाठी पगडी घालत नाही’, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक

व्हिडीओ पाहा :

Know the total property net worth of Navjot Singh Sidhu who not payed electricity bill

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI