AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge News : भारताचे 100 रुपये सिरियामध्ये किती होतात? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल जबर धक्का

भारताचं चलन रुपया हे काही देशांच्या चलनाच्या तुलनेत खूपच स्ट्रॉग आहे, तर काही चलनाच्या तुलनेत मात्र मागे आहे, आज आपण भारताचे शंभर रुपये सिरियामध्ये किती होतात? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Knowledge News : भारताचे 100 रुपये सिरियामध्ये किती होतात? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल जबर धक्का
Indian rupees vs Syrian currencyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2025 | 5:22 PM
Share

सिरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अल-शरा हे कधीकाळी अलकायदा या दहशतवादी संघटनेचे कमांडर होते. या संघटनेला अमेरिकेनं देखील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. त्यावेळी अल-शरा यांना पकडण्यासाठी दहा मिलियन डॉलरच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच आता अमेरिकेनं अल-शरा यांना आपल्या ब्लॅक लिस्टमधून बाहेर काढलं आहे. त्यानंतर आता अल -शरा हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये ट्रम्प हे अल शरा यांची गंमत करताना तुम्हाला किती पत्नी आहेत? असा प्रश्न विचारत आहेत. चलातर मग याच निमित्तानं जाणून घेऊयात सिरियामध्ये भारताचे शंभर रुपये किती होतात?

सिरियाई पाउंड ही सिरियाची अधिकृत करन्सी आहे. यालाच शॉर्टमध्ये SYP असं देखील म्हणतात तर भारतीय रुपया ही भारताची अधिकृत करन्सी असून त्याला आपण INR असं लिहितो, सांकेतिक रुपामध्ये सिरियाई चलनाला £S किंवा LS असं लिहिलं जातं. सिरियाई पाउंड किंवा तेथील करन्सीला तेथील सेंट्रल बँक असलेली सेंट्रल बँक ऑफ सिरिया कंट्रोल करते. भारत आणि सिरियाच्या चलनामध्ये खूप मोठं अतंर आहे. भारताचे दहा रुपये सिरियामध्ये 905 सिरीयाई पाऊंड होतात, याचाच अर्थ भारताचे शंभर रुपये सिरियामध्ये 9059 सिरियाई पाऊंड होतात. यामधून तुम्हाला दोन्ही देशाच्या चलनातील फरक समजू शकतो.

सिरियामध्ये कधीकाळी ऑटोमन लीराचं चलन होतं. 20 व्या शतकात सिरियावर जेव्हा ओटोमन साम्राज्य ( तुर्कीचं शासन) होतं तेव्हा तिथे ऑटोमन लीराचं चलन अस्तित्वात होतं. त्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये सिरियावर फ्रान्सचं राज्य आलं, तेव्हा पुन्हा एकदा येथील चलनामध्ये बदल झाला. 1919 मध्ये येथे फ्रान्सने पॅलेस्टाईन पाउंड नावानं चलन सुरू केलं, त्यातूनच आता सरियामध्ये असलेलं सध्याचं चलन अस्तित्वात आलं आहे.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.