AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या विरोधात अभिनेत्याच्या पत्नीची बंडखोरी, लोकसभा निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे. तशी चुरस वाढत आहे. काही ठिकाणी नाराज असलेले नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपचे माजी खासदार दिवंगत अभिनेत्याची पत्नीने देखील भाजपने दिलेल्या उमेदवाराला विरोध केला असून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

भाजपच्या विरोधात अभिनेत्याच्या पत्नीची बंडखोरी, लोकसभा निवडणूक लढवणार
Loksabha election
| Updated on: Apr 02, 2024 | 3:06 PM
Share

Loksabha election : सनी देओलने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबमधील गुरुदासपूरमधून भाजपने दिनेश सिंह बब्बू यांना उमेदवारी दिली आहे. पण याला अनेकांनी विरोध केला आहे. ज्यामध्ये दिवंगत माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनीच आता या जागेवरून निवडणूक लढवण्याची घोषणाही केलीये. गुरुदासपूर हे माझे कुटुंब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार सुमारे 70-80% लोकांना आपण खासदार व्हावे असे वाटतेय. पण कविता खन्ना आता कोणत्या पक्षातून लढणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

कविता खन्ना इच्छूक होत्या

कविता खन्ना यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर कविता खन्ना या गुरुदासपूरमधून इच्छूक होत्या. भाजप त्यांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.

कविता खन्ना म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे मी गुरुदासपूरमध्ये विनोद खन्ना यांच्या खांद्याला खांदा लावून लोकांची सेवा केली आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर लोकांनी त्यांनी खूप प्रेम दिले. मी कविता आणि विनोद खन्ना फाउंडेशनची स्थापना केली आहे. कविता खन्ना या विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी आहे. कविता आणि विनोद खन्ना यांची भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले.

कविता खन्ना या बॅरिस्टर आहेत. त्यांनी परदेशातून एलएलबीचे  केले असून उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. विनोद खन्ना खासदार असताना कविता खन्ना या 3 वर्षे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. कविता यांच्या माहितीनुसार त्यांनी 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशात रोजगार वाढवण्याच्या प्रकल्पावरही काम केले होते.

भाजपचा बालेकिल्ला

गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघावर आधी काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र आता ही जागा भाजपचा बालेकिल्ला आहे. 1998 मध्ये भाजपने विनोद खन्ना यांना येथून तिकीट दिले आणि ते विजयी झाले. 1999 आणि 2004 च्या निवडणुकाही त्यांनी जिंकल्या. मात्र, 2009 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि प्रतापसिंह बाजवा येथून खासदार झाले. विनोद खन्ना यांनी 2014 मध्ये पुनरागमन केले. 2017 मध्ये त्यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि त्यात काँग्रेसचे सुनील जाखड विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस ही जागा राखू शकली नाही आणि बॉलीवूड स्टार सनी देओल यांनी सुनील जाखड यांचा पराभूत झाला.

विनोद खन्ना यांनी खासदार असताना अनेक प्रकल्प मंजूर करुन घेतले. ज्यामुळे त्यांचा प्रभाव या मतदारसंघात वाढला होता. पण त्यांच्या निधनानंतर आता या जागेवर त्यांच्या पत्नी कविता खन्ना यांनी दावा केला आहे.

येथे सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. १ जून रोजी येथे मतदान होणार आहे.जिल्ह्यात राजपूत समाजाचे मतदार अधिक आहेत. भाजपचे उमेदवार दिनेश सिंह बब्बू हे पठाणकोट जिल्ह्यातील सुजानपूरचे तीन वेळा माजी आमदार आहेत. तेही राजपूत आहेत.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.