GST कमी केल्यावर सामान महाग देताय का? WhatsApp वर तक्रार करा
GST कपातीमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. पण, अनेकदा असं होऊ लागलं आहे की, कमी झालेल्या दरात ग्रहकांना वस्तू दिल्या जात नाही. यासाठी नेमकं काय करावं, हे पुढे जाणून घेऊया.

GST कपातीमुळे अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बाजारात गेले तर तुम्हाला अनेक वस्तू, या स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. पण, अलिकडे असे काही प्रकरणं समोर आले आहेत, ज्यात जुन्या दरानेच वस्तू विकल्या जात आहे, यासाठी तुम्ही तक्रार करू शकतात. आता तक्रार कुठे करावी, याची माहिती पुढे वाचा.
लोकांच्या खिशावरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने GST दरात कपात केली आहे, जी 22 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत, परंतु तरीही अनेक दुकानदार किंवा कंपन्या महागड्या किंमतीत वस्तू विकत आहेत.
GST दर कमी असूनही जर तुम्हालाही महाग वस्तू मिळत असतील तर तुम्ही दुकानदार किंवा कंपनीविरोधात तक्रार दाखल करू शकता. WhatsApp वरून टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल.
GST कपात करूनही ग्राहकांना त्याचा लाभ मिळत नसल्याबद्दल सोशल मीडियावर काही पोस्टच्या माध्यमातून ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. हे लक्षात घेऊन सरकारने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सरकारने लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना असे वाटत असेल की GST दर कपातीचा फायदा दुकानदार किंवा कंपन्यांकडून तुम्हाला मिळत नसेल तर आता तुम्ही थेट तक्रार करू शकता. यासाठी अनेक सोपे पर्याय उपलब्ध आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न जाहीर
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने या संदर्भात जारी केलेल्या एफएक्यू सेटमध्ये असे म्हटले आहे की, ग्राहक टोल फ्री क्रमांक 1915 वर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर (एनसीएच) कॉल करून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. याव्यतिरिक्त, आपण WhatsApp वर तक्रार करण्यासाठी 8800001915 संदेशही पाठवू शकता. ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहक INGRAM पोर्टल वापरू शकतात, जे एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणा आहे.
आता केवळ दोन कर स्लॅब
22 सप्टेंबरपासून सरकारने जीएसटीचे जुने चार स्लॅब (5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के) कमी करून आता फक्त दोन स्लॅब केले आहेत. उर्वरित 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत.
सीबीआयसीच्या मते, यामुळे 99 टक्के सामान्य ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मात्र, काही दुकानदार आणि ब्रँड अजूनही जुन्या दरात वस्तू विकत असल्याची तक्रार सोशल मीडियावरील अनेक ग्राहकांनी केली आहे. हे लक्षात घेऊन तक्रार दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नफेखोरीविरोधी यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही
GST कपातीनंतर सरकारने या प्रकरणात कोणतीही औपचारिक नफेखोरी विरोधी यंत्रणा लागू केली नसली तरी किंमतींच्या ट्रेंडवर लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतील.
