लोजपा खासदार रेप केसमध्ये ट्विस्ट, शरीर संबंध ठेवल्याची कबूली, 2 लाख रुपयेही दिले

येणाऱ्या काळात प्रिन्स राज यांना पोलिसांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण एका तरुणीने प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानंतर प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोजपा खासदार रेप केसमध्ये ट्विस्ट, शरीर संबंध ठेवल्याची कबूली, 2 लाख रुपयेही दिले
लोकसभा खासदार प्रिन्स राज


नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात प्रिन्स राज यांना पोलिसांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण एका तरुणीने प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानंतर प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (twist in case of LJP MP Prince Raj, confession of having sexual intercourse with a young woman)

प्रिन्स राज यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यांप्रमाणे हे प्रकरण साधं आणि सरळ नसल्याचं आता समोर आलंय. प्रिन्स राज यांनीही यापूर्वी संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रिन्स यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार संबंधित तरुणीची 2019 मध्ये भेट झाली होती. जून 2020 च्या सुरुवातीला दोघे एकमेकांच्या जवळ आले. 18 जून 2020 ला तरुणीने त्यांना गाझियाबादेतील आपल्या घरी बोलावलं. जिथे त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. तर तरुणीचा आरोप की प्रिन्स यांनी आपल्या मनाविरोधात शरीरसंबंध प्रस्थापित केले.

चिराग पासवान यांनी मदत केली नसल्याचा आरोप

त्याचबरोबर तरुणीने प्रिन्स राज यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मदत केली नसल्याचा आरोप केलाय. चिराग पासवान यांनी वारंवार फक्त आश्वासन दिलं, मात्र मदत केली नाही, असं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

खासदार प्रिन्सवर आता बलात्काराची केस

संबंधित तरुणीने तीन महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांकडून प्रिन्स राज यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तर प्रिन्स राज यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये युवतीविरोधात ब्लॅकमेलिंग आणि एक्सटॉर्शनची तक्रार दाखल केली होती. प्रिन्स राज हे लोजपचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे छोटे बंधू दिवंगत रामचंद्र पासवान यांचे चिरंजीव आहेत. लोक जनशक्ती पार्टी चिराग गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांचे ते चुलत भाऊ आहेत. त्याचबरोबर मोदींच्या मंत्रिमंडळात नुकताच सहभाग झालेले पशुपती पारस यांचे ते भाचे आहेत.

तरुणीकडून कनॉट प्लेसमध्येही लिखीत तक्रार

संबंधित तरुणीकडून जून 2021 मध्ये कनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तीन पानांची लिखित तक्रार केली होती. एफआयआर दाखल करण्यास उशीर होत असल्यानं तरुणी कोर्टात गेल्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार प्रिन्स राज यांनीही तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत त्यांनी संबंधित तरुणी आणि तिच्या साथीदारांवर ब्लॅकमेलिंग आणि एक्सटॉर्शनचा आरोप केलाय. प्रिन्स यांनी लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

इतर बातम्या :

अतुल भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, मनिषा कांयदेंचा पलटवार

माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

twist in case of LJP MP Prince Raj, confession of having sexual intercourse with a young woman

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI