खासदाराकडून पार्टीतील महिलेवर बलात्कार,न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून चिराग पासवानांच्या चुलत भावावर गुन्हा दाखल

MP prince Raj | दिल्ली उच्च न्यायालयाने 9 सप्टेंबरला पोलिसांना तीन महिन्यांपूर्वीच्या तक्रारीच्या आधारे प्रिन्स राज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले होते. मात्र, प्रिन्स राज यांनी 17 जून रोजी एक ट्विट करुन आपल्यावरील सर्व आरोप नाकारले होते.

खासदाराकडून पार्टीतील महिलेवर बलात्कार,न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून चिराग पासवानांच्या चुलत भावावर गुन्हा दाखल
प्रिन्स राज आणि चिराग पासवान

नवी दिल्ली: लोक जनशक्ती पार्टीचे (LJP) खासदार आणि चिराग पासवान यांचे चुलत बंधू प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध एका महिलेल्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला लोक जनशक्ती पार्टीची कार्यकर्ता असल्याचे समजते. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिसांकडे तीन महिन्यांपूर्वीच महिलेने तक्रार केली होती. प्रिन्स राज यांनी आपल्यावर अत्याचार केले आणि धमकावले, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते. प्रिन्स राज हे बिहारच्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रिन्स राज यांच्यावर 376, 376 (2)(K), 506, 201, 120B या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने 9 सप्टेंबरला पोलिसांना तीन महिन्यांपूर्वीच्या तक्रारीच्या आधारे प्रिन्स राज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले होते. मात्र, प्रिन्स राज यांनी 17 जून रोजी एक ट्विट करुन आपल्यावरील सर्व आरोप नाकारले होते. संबंधित महिला आपल्याला बदनाम करत असल्याचे प्रिन्स राज यांनी म्हटले होते. मी माझ्यावरील सर्व आरोप नाकारत आहे. हे आरोप निराधार, विशिष्ट हेतूने करण्यात आले आहेत. हा एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असून मला लक्ष्य करण्यासाठीच हे आरोप करण्यात आल्याचा दावा प्रिन्स राज यांनी केला होता.

कारवाईत चालढकल झाल्याने चिराग पासवानही संशयाच्या फेऱ्यात

या प्रकरणात पीडित महिलेने तीन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. मात्र, चिराग पासवान यांच्या दबावामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यास उशीर झाला, असा आरोप होत आहे. त्यामुळे याप्रकरणात चिराग पासवानही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

प्रिन्स राज यांच्याकडून महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल

खासदार प्रिन्स राज यांनी 10 फेब्रुवारी 2021 रोजी संबंधित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी प्रिन्स राज यांनी म्हटले होते की, एका महिलेने माझ्यावर काही आरोप केले आहेत. त्यामुळे मी 10 फेब्रुवारी रोजीच तक्रार दाखल केली होती. यावेळी मी पोलिसांकडे सर्व पुरावे सादर केल्याचेही प्रिन्स राज यांनी म्हटले.

इतर बातम्या:

हिमाचल प्रदेशातही मुख्यमंत्री बदलणार? जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीचं बोलावणं

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान

क्लिनिकल चाचण्यांमध्ये मोठा खुलासा ! लस घेऊनही 20 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी नाही, लवकरच बूस्टर डोसला परवानगी ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI