माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. (vijay wadettiwar)

माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (obc reservation: then i will resign, says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

सध्या राजकीय आकांडतांडव

ओबीसींच्या आधी रिक्त असलेल्या जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. आम्हीही घोषणा केली आहे. हे करून उद्या जर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा प्रश्न निर्माण झाला तर तिथे ओबीसी कॅटेगिरीतीलच माणूस हवा. तुम्हाला ती जागा रिझर्व्ह हवी तरच अध्यक्ष होईल. पण अध्यक्ष करताना अडचण येणार नाही, असं सांगतानाच परंतु सर्वांनीच ठरवल्याने उद्या ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होणार आहे. ओबीसी विरुद्ध ओपन होणार नाही. आता या पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय आकांडतांडव सुरू आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यापलिकडे काही नाही. महाराष्ट्रातील जनता योग्य निर्णय घेईल. त्यावरून कळेल कुणाची चूक आहे, असा दावाही त्यांनी केला.

भाजपला हरवण्यावर एकमत

महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही. भाजपला हरवायचं यावर आघाडीचं एकमत आहे. ज्या ज्या महानगरपालिकेबाबत काय निर्णय घ्यायचा ते सर्वानुमते घेऊ. अ ब आणि क महापालिकेत किती वॉर्ड असावेत वगैरे ही चर्चा सुरू आहे. काहीच अंतिम निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. (obc reservation: then i will resign, says vijay wadettiwar)

असा आहे निवडणूक कार्यक्रम

15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल

किती जागांसाठी निवडणूक

जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगाा

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन, एक हजार ठिकाणी निदर्शने; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

राज्य सरकारचीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता?; भुजबळ नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

(obc reservation: then i will resign, says vijay wadettiwar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI