भावाचा कोरोनाने मृत्यू, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर

कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. (Lockdown In Bengal For 15 days From Tomorrow, Essential Services Allowed)

भावाचा कोरोनाने मृत्यू, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर
West Bengal Lockdown
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 3:43 PM

कोलकाता: कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. 16 मे रोजी पहाटे 6 वाजल्यापासून ते 30 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं कोरोनाने निधन झालं. त्यानंतर बंगालमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. (Lockdown In Bengal For 15 days From Tomorrow, Essential Services Allowed)

राज्याचे मुख्यसचिव आलापन बंधोपाध्याय यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवांशिवाय राज्यात काहीच सुरू राहणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांनाच प्रवासाची मुभा असणार आहे. तसेच लग्नामध्ये केवळ 50 लोकच सहभागी होऊ शकतील. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकच उपस्थित राहतील, असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

थेट गुन्हे दाखल करणार

लॉकडाऊनचं सक्तीचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि तोंडाला मास्क लावणंही बंधनकारक आहे, असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सांगितलं.

काय बंद राहणार

>> सर्व शिक्षण संस्था बंद राहणार >> सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार. केवळ आवश्यक सरकारी कार्यालयेच सुरू राहतील. >> सर्व खासगी कार्यालये बंद राहणार. वर्क फ्रॉम होमला परवानगी >> सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बार, जिम आणि मनोरंजनाशी संबंधित स्थळे बंद राहतील >> शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, सिनेमा हॉलही बंद राहणार >> बस, मेट्रो सर्व बंद राहणार. आंतरराज्यीय बससेवाही बंद राहणार >> राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील >> मेडिकलशी संबंधित उद्योग सोडून सर्व उद्योग बंद राहील >> रात्री 9 नंतर आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील

काय सुरू राहणार

>> सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत किराणा दुकान आणि किरकोळ व्यापारी दुकाने सुरू राहतील >> मिठाई आणि मटनाचे दुकान सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. >> चहाच्या मळ्यांमध्ये 50 टक्के सूट राहील. 30 टक्के उपस्थितीत चहाच्या मळ्यांमध्ये काम सुरू राहील. >> ई-कॉमर्स सेवा सुरू राहील. >> एटीएम आणि बँका सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. >> विवाहात केवळ 50 तर अंत्यसंस्काराला 20 लोकांच्या उपस्थितीला परवानगी >> ऑप्टिकल दुकाने सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार.

भावाचं निधन

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा आज सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. असीम यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यांपासून ते रुग्णालयात अॅडमिट होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झालं होतं. आज सकाळीच कोरोना नियमांचं पालन करत निमाताला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असीम हे कालीघाट येथे राहत होते. (Lockdown In Bengal For 15 days From Tomorrow, Essential Services Allowed)

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू असीम बॅनर्जींचा कोरोनाने मृत्यू

ये पब्लिक है, सब जानती है!, देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, 23 दिवसांपासून व्हेटिंलेटरवर

(Lockdown In Bengal For 15 days From Tomorrow, Essential Services Allowed)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.