AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Exclusive Narendra Modi interview : देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही का? विरोधकांच्या आरोपांना मोदींनी दिले दोन वाक्यांत उत्तर

prime minister narendra Modi exclusive interview: देशात ही शेवटची निवडणूक असल्याचा आरोप विरोधक करत असल्याचा प्रश्न विचारला. देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वाक्यात रोखठोक उत्तर देत सर्व विरोधकांना निरुत्तर केले आहे.

TV9 Exclusive Narendra Modi interview : देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही का? विरोधकांच्या आरोपांना मोदींनी दिले दोन वाक्यांत उत्तर
narendra modi
| Updated on: May 02, 2024 | 2:30 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांच्या धडका लावला आहे. महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्या प्रचारसभा गाजत आहेत. निवडणुकीच्या या व्यस्ततेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तरे दिली आहेत. देशाची राज्य घटना बदलणार का? 2029 नंतर निवडणुका होणार नाही का? असे प्रश्न विचारले गेले. तसेच मुंबईतील दोन महत्वाच्या मुद्यांवर नरेंद्र मोदी यांनी रोखठोक उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर मत मांडले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवार यांच्या कुटुंबियांपर्यंत नरेंद्र मोदी बोलले आहेत. ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावतसह TV9 ग्रुपच्या पाच संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत तुम्ही टीव्ही ९ मराठीसह, https://www.youtube.com/@TV9MarathiLive आणि https://www.tv9marathi.com/ या ठिकाणी मुलाखत २ मे रोजी रात्री ८ वाजता पाहू शकतात.

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या दोन वर्षांत खूप बदलला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली. यामुळे मोदी यांनी मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. मोदी यांच्या उत्तरातून महाराष्ट्रातील राजकारणात मोठी बातमी मिळणार आहे.

देशात निवडणुका होणार नाही का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांनी देशात ही शेवटची निवडणूक असल्याचा आरोप विरोधक करत असल्याचा प्रश्न विचारला. देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वाक्यात रोखठोक उत्तर देत सर्व विरोधकांना निरुत्तर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या देशात ९०० टीव्ही चॅनल्स सुरु आहेत. ज्या देशात न्यायालयात इतके सक्रीय आहे, त्या देशात या गोष्टी अशक्य आहेत.

बाळासाहेबांबद्दल बोलताना भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मधील सर्वात मोठी मुलाखत ‘टीव्ही-९’ ला दिली आहे. ‘टीव्ही-९’ समुहातील पाच संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. पंतप्रधानांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना ते भावूक झाले. त्यांनी मिनाताई ठाकरे यांच्यासंदर्भातील आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि पवार कुटुंबियांसंदर्भात सडेतोड उत्तर दिले आहे. राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ही मुलाखत २ मे रोजी रात्री ८ वाजता ‘टीव्ही ९’ मराठीवर प्रसारीत होणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...