AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSP Mayawati : मायावतींच्या घरात दणादण घुसले NSG कमांडो, पाठोपाठ सायरन वाजवत रुग्णवाहिका, नेमकं काय घडलं?

BSP Mayawati News : यूपी पोलिसांच पथक घराच्या आत आणि बाहेर हजर होतं. मेडिकल टीमही सोबत होती. सगळ्यांच्या नजरा घराच्या गेटवर लागल्या होत्या. सर्वांना हेच जाणून घ्यायच होतं की, अचानक असं काय घडलं की, मायावतीच्या घरात एनएसजी कमांडो घुसले.

BSP Mayawati : मायावतींच्या घरात दणादण घुसले NSG कमांडो, पाठोपाठ सायरन वाजवत रुग्णवाहिका, नेमकं काय घडलं?
BSP Mayawati
| Updated on: Mar 19, 2025 | 9:30 AM
Share

सध्या बहुजन समाज पार्टीमध्ये (बसपा) अंतर्गत कलह सुरु आहे. जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या घरी एक वेगळीच धावपळ दिसून आली. मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या या घरामध्ये अचानक एकापाठोपाठ एक NSG कमांडो दणादण करुन घरात घुसले. मायावती या घरात राहतात. जोरात सायरन वाजत रुग्णवाहिका घराच्या आवारात शिरली. यावेळी यूपी पोलिसांच पथक घराच्या आत आणि बाहेर हजर होतं. मेडिकल टीमही सोबत होती. सगळ्यांच्या नजरा घराच्या गेटवर लागल्या होत्या. सर्वांना हेच जाणून घ्यायच होतं की, अचानक असं काय घडलं की, मायावतीच्या घरात एनएसजी कमांडो घुसले. जाणून घेऊया हे सर्व प्रकरण काय आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना एनएसजी सुरक्षा आहे. मायावती यांच्या घरातल्या सुरक्षा स्थितीचा आणि सुरक्षा पथकाच्या तत्परतेचा आढावा घेण्यासाठी NSG कमांडोजनी मॉकड्रील केली. 9 माल एवेन्यू येथील माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या निवासस्थानी ही मॉकड्रील पार पडली. सुरक्षारक्षक, ड्रायव्हर आणि NSG या मॉकड्रीलमध्ये सहभागी होते. स्थानिक पोलीस, फायर विभाग आणि मेडीकल टीम आपल्या रुग्णावाहिकेसह त्यावेळी तिथे हजर होते.

एनएसजी बेस्ट कमांडोज

रुग्णवाहिकेसह तमाम एनएसजी कमांडो मायावती यांच्या घरात घुसले, त्यावेळी इथे मोठा सुरक्षा बंदोबस्त होता. संकटाची स्थिती ओढवली, तर त्याचा कसा सामना करायचा, याचा आढावा घेण्यात आला. नॅशनल सिक्योरिटी गार्ड म्हणजे NSG. एनएसजी कमांडोजचा जगातील बेस्ट कमांडोजमध्ये समावेश होतो. थोड्यावेळाने एनएसजी कमांडो आणि अधिकारी मायावती यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. मायावती यांच्या घरी ही ड्रील करण्यात आली.

NSG सुरक्षा कोणाला?

उत्तर प्रदेशात काही ठराविक लोकांना एनएसजीच सुरक्षा कवच मिळालेलं आहे. त्यात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिसऱ्या मायावती आहेत. मायावती यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो नेहमीच तैनात असतात. आपातकालीन स्थितीचा कसा सामना करायचा, त्याची तपासणी करण्यासाठी NSG कडून ही मॉकड्रील करण्यात आली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.