सरपंचाचं डोकं फिरलं, कुत्र्याच्या नावावर 18 एकर जमीन केली, असं का घडलं?

त्यांनी मृत्यूपत्रात मुलांवर विश्वास नसल्याचेही कारण दिले आहे. (Madhya Pradesh old farmer divided property between wife and his dog)

सरपंचाचं डोकं फिरलं, कुत्र्याच्या नावावर 18 एकर जमीन केली, असं का घडलं?

भोपाळ : तुम्हाला अक्षय कुमारचा ‘एंटरटेनमेंट’ हा चित्रपट आठवतो का? त्या चित्रपटात एका श्रीमंत व्यापाऱ्याने आपली कोट्यावधींची संपत्ती कुत्र्याच्या नावे केली होती. मात्र या चित्रपटाप्रमाणे रिअल लाईफमध्येही अशाप्रकारे एक घटना घडल्याचे समोर आलं आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका 50 वर्षीय व्यक्तीने त्याच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा हा कुत्र्याच्या नावे केला आहे. त्याच्या या निर्णयाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (Madhya Pradesh old farmer divided property between wife and his dog)

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चांद तालुक्यात बदीबाबा नावाचे एक गाव आहे. या गावात ओम नारायण वर्मा राहतात. ते माजी सरपंच आहे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. मात्र ओम वर्मा हे आपल्या मुलांच्या वागणुकीवर नाखूष आहे. त्यांना त्याच्या मुलांवर अजिबात विश्वास नाही.

त्यांच्या पश्चात संपत्तीवरुन होणारे वाद टाळण्यासाठी त्यांनी मृत्यूपत्र तयार केलं आहे. यात त्यांनी आपल्या संपत्तीचे वाटप कशापद्धतीने केले जाईल, याबाबतची माहिती दिली आहे. ओम वर्मा यांनी त्यांची 18 एकर जमिनीची पत्नी आणि पाळीव कुत्रा या दोघांमध्ये समप्रमाणात विभागणी केली आहे. या संपत्तीचे वाटप केल्यानंतर याबाबत मृत्यूपत्रात नोंद केली आहे.

विशेष म्हणजे जो कुणी त्यांच्या पश्चात त्या पाळीव कुत्र्याची काळजी घेईल, त्याला कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा हक्क मिळेल. त्यामुळे आता त्या कुत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच कोर्टाच्या नोटरी नियमानुसार मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन केले आहे. त्यांनी मृत्यूपत्रात मुलांवर विश्वास नसल्याचेही कारण दिले आहे.

ओम वर्मा यांच्या या निर्णयाची सध्या संपूर्ण गावात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे ओम वर्मा यांनी हा अंतिम निर्णय असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांना दिली आहे. (Madhya Pradesh old farmer divided property between wife and his dog)

संबंधित बातम्या : 

नवीन वर्षात एक लाख जिंका, मोदी सरकारकडून खास संधी

BREAKING NEWS : उच्च न्यायालयाच्या चार मुख्य न्यायाधीशांसह 10 न्यायाधीशांची बदली, कायदा मंत्रालयाची माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI