AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाबा मी अजून जिवंत आहे..’, अंत्यसंस्कारानंतर लेकीचा आला व्हिडीओ कॉल अन्..

महिन्याभरापासून गायब असलेल्या लेकीचा कुटुंबिय कसून शोध घेत होते, मात्र तेवढ्यात तिच्या मृत्यचे वृत्त समोर आल्याने सगळेच हादरले. तिचे अंत्यसंस्कार पूर्ण करून घरी आले न आले तोच, मोबाईलवर आलेल्या एका व्हिडीओ कॉलने त्यांना अजून मोठा धक्का बसला.

'बाबा मी अजून जिवंत आहे..', अंत्यसंस्कारानंतर लेकीचा आला व्हिडीओ कॉल अन्..
| Updated on: Aug 21, 2023 | 9:58 AM
Share

पाटणा | 21ऑगस्ट 2023 : काळजाचा तुकडा असणारी लेक (daughter missing) अचानक गायब झाल्याने काळजीत पडलेले कुटुंबिय तिच्या मृत्यूच्या वृत्ताने (death news) पूर्णच खचले. या बातमीमुळे शोकग्रस्त असलेल्या वडिलांच्या फोनवर एक व्हिडीओ कॉल आला अन् त्यामुळे त्यांचं आयुष्यचं बदललं.

‘बाबा मी अजून जिवंत आहे..’, जिचा अंत्यसंस्कार करून आले, तिचाच आवाज व्हिडीओ कॉलवर ऐकणे हे वडिलांसाठी एका चमत्कारच होता. अंशू कुमारीच्या वडिलांना हा कॉल आला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते, आणि आता तीच मुलगी त्यांच्यासमोर बोलत होती, हे पाहून आधी त्यांना धक्का बसला, पण थोड्याच वेळात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्या मुलीचा मृतदेह समजून त्यांनी दुसऱ्याच तरूणीवर अंत्यसंस्कार केले होते. मात्र , त्यांच्या मुलीने तिच्याच प्रियकराच्या घरातून फोन करून त्यांना आपण जिवंत असल्याचे सांगितले.

नक्की काय झालं होतं ?

पूर्णिया येथील रहिवासी असलेली अंशू कुमारी ही महिन्याभरापूर्वी हरवली होती. त्यामुळे चिंतामग्न कुटुंबियांनी तिचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली, पोलिसांतही तक्रार नोंदवली होती, मात्र तिचा शोध काही लागला नाही. पण गेल्याच आठवड्यात पोलिसांना तेथील एका नाल्यात एका मुलीचा मृतदेह सापडला आणि त्यांनी अंशूच्या कुटुंबियांना ओळख पटवण्यासाठी बोलावले. तिचा चेहरा अतिशय खराब झाल्याने कुटुंबियांवी तिच्या कपड्यांवरून ही आपलीच लेक असल्याचे पोलिसांना सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुलीच्या अकस्मात मृत्यूमुळे तिच्या वडिलांना एवढा धक्का बसला, की ते तिचे अंत्यसंस्कारही पूर्ण करू शकले नाहीत. अखेर तिच्या आजोबांनी कार्य पार पाडले. या घटनेचे वृत्त आसपासच्या भागात तसेच सोशल मीडियावरूनही व्हायरल झाले आणि अंशूलाही ही बातमी कळली. तिने लगेचच वडिलांच्या फोनवर व्हिडीओ कॉल केला. ‘बाबा मी अजून जिवंत आहे..’,असे सांगत अंशूनेआपण सुखरूप असल्याचे वडिलांना सांगितले. हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, संपूर्ण कुटुंबाने सुखाचा श्वास घेतला.

कुठे गायब होती मुलगी ? 

आपण लग्न करण्यासाठी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे आणि सध्या जानकीनगर भागात सासरच्यांसोबत रहात असल्याचेही अंशूने वडिलांना कळवले. पोलिसांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी अंशूला व्हिडीओ कॉल करत संपूर्ण घटना जाणून घेतली. मी सासरी असून नीट, सुखरूप आहे असे तिने पोलिसांना सांगितले.

दरम्यान ज्या तरूणीच्या मृतदेहावर अंशू समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तिचीही ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे ऑनर किलींगचे प्रकरण असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आम्ही मृत तरूणीच्या पालकांच्या घरावर छापा तर मारला, पण ते तेथून फरार झाल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.