Mamata Banerjee Injured : ममता बॅनर्जींवर हल्ला नाही तर अपघात! हल्ल्याचे पुरावे नाहीत- निवडणूक आयोग

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे जोरदार राजकारण रंगलं आहे. पण ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय.

Mamata Banerjee Injured : ममता बॅनर्जींवर हल्ला नाही तर अपघात! हल्ल्याचे पुरावे नाहीत- निवडणूक आयोग

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे जोरदार राजकारण रंगलं आहे. पण ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरुन निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.(EC has clarified that there is no evidence that West Bengal CM Mamata Banerjee was attacked)

अहवालानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. त्यांना झालेली दुखापत ही छोट्याशा अपघातामुळे झाल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. स्पेशल ऑब्जर्व्हर अजय नायक यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणूक आयोगाने असं म्हटलं आहे. हा अहवाल शनिवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी होतं. त्या अहवालात ममता बॅनर्जी यांना दुखापत नेकमी कोणत्या कारणामुळे झाली, हेच सांगितलं गेलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत एक सविस्तर अहवाल मागवला होता.

कडेकोट सुरक्षा असताना ममतांवर हल्ला होऊच कसा शकतो?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यात 3 एस्कॉर्ट कार, 2 इंटरसेप्शन कार, महिला पोलिसांची एक गाडी, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकांच्या तीन गाड्या, टेल कार आणि स्पेअर इंटरसेप्शन कारचा समावेश असतो. चार पायलट कार ताफ्याच्या नेहमी पुढे असतात. यामध्ये डीएसपी आणि सब इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस अधिकारी असतात. मग इतक्या कडेकोट सुरक्षेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होऊच कसा शकतो, अशी शंका भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे.

नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली, असं तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायला दुखापत झाली असून, पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर

VIDEO : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

EC has clarified that there is no evidence that West Bengal CM Mamata Banerjee was attacked

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI