Crime | Marriage | …म्हणून ‘त्यानं’ चक्क आपल्याच बहिणीशी लग्न केलं!

फिरोजाबादच्या टुंडलामध्ये 11 डिसेंबरला एक सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकानं हद्दच केली. आपल्याच चुलत बहिणीसोबत एकानं लग्न केलं.

Crime | Marriage | ...म्हणून 'त्यानं' चक्क आपल्याच बहिणीशी लग्न केलं!
प्रातिनिधिक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 21, 2021 | 12:20 PM

मुलीचं लग्नाचं वय (#MarriageAgeDebate) काय असावं यावरुन सध्या संपूर्ण देशात वादविवाद सुरु आहे. मुलींच्या लग्नाचं वय 21 वर्ष करण्याच्या निर्णयाला केंद्रानंही मंजुरी दिली आहे. पण लग्नाच्या बाबतीतसुद्धा भारतातील (Indians) लोक प्रचंड जुगाडू आहेत. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जुगाड करण्यासाठी ते मागचापुढचा विचार करत नाहीत. गोष्टी करुन मोकळे होतात. असाच एक विचित्र पण नकोसा जुगाड एकानं केला. सरकारी योजनेचा (Government Scheme) लाभ मिळवण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क आपल्याच बहिणीसोबत लग्न (Marriage) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे फिरोजाबादमध्ये!

काय आहे प्रकरण?

फिरोजाबादच्या (Firozabad) टुंडलामध्ये 11 डिसेंबरला एक सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकानं हद्दच केली. आपल्याच चुलत बहिणीसोबत एकानं लग्न केलं.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजने अंतर्गत 20 हजार रुपये आणि सोबतच 10 हजार रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या जात असल्यानं फिरोजाबादमध्ये एका पठ्ठ्यानं आपल्याच चुलत बहिणीसोबत लग्नाचा जुगाड केला. सोबतच लग्नाचा खर्चही सरकारच उचलत असल्यानं एकानं आपल्या चुलत बहिणीसोबत लग्नाचा बनाव करण्याची कल्पना गळी उतरवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चुलत बहीणही हे जुगाडू लग्न करण्यासाठी तयार झाली.

प्रातिनिधिक फोटो

कळलं कसं?

फिरोजाबादच्या टुंडला ब्लॉक डेव्हलम्पेन्ट कार्यालय परिसरात या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट सुरुवातीला दोघांच्या तोंडावर मुंडावळ्या आणि इतर सजावटीमुळे त्यांचे चेहरे कुणाला कळू शकले नाहीत. पण नंतर मात्र गावातील लोकांनी या दोघांनाही ओळखलं आणि या जुगाडाचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे हा जुगाड करणाऱ्याचं याआधीच एक लग्न झालेलं असून त्याला दोन मुलंही असल्याचं नंतर समोर आलंय.

पुढं काय?

एकूण 51 जोड्यांची लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यात झाली होती. त्यातील हे एक जोडपं राज्यातील सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नाचा बनाव रचण्यासाठी आलं असल्याचं नंतर उघडकीस आलं. आता या दोघांचीही कायदेशीर चौकशी केली जाते आहे. खरं तर असं झालंच कसं काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण सामूहिक विवाह सोहळ्याआधी ग्रामपंचायतीला दाम्पत्यांची आधार कार्ड (Adhaar Card), वोटिंग आयडी (Voting ID), बँकेंचं अकाऊंट (Bank Account) या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. या सगळ्या सोपस्कारांमधून बहिणीसोबत लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार कुणाच्याच नजरेत कसा काय आला नाही, याबाबतही शंका घेतली जाते आहे.

याप्रकरणी आता गुन्हा दाखल करणयात आला असून पुन्हा एकदा सगळ्या कागदपत्रांची तपासणीही पोलिसांकडून केली जाते आहे. सोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या सर्च 51 जोडप्यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाते आहे.

बहिणी लग्न करणं ‘गुन्हा’

हिंदू विवाह कायद्यानुसार भाऊ-बहिणींनी लग्न करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. मुळात असं करण्यावर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 5 अन्वये बंदीदेखील घालण्यात आली आहे. शिवाय लग्न झालेली व्यक्ती पुन्हा दुसऱ्या व्यक्तीशी थेट लग्न करु शकत नाही. त्याआधी घटस्फोट घ्यावा लागतो. तसं केल्या दुसरं लग्न हे अवैध ठरवलं जातं! विशेष म्हणजे भाऊ-बहीण, काका-काकी, अशी रक्ताची नाती जोडली गेलेल्या व्यक्तींपासून झालेल्या चुलत भावंडांसोबत लग्न करण्यावर सक्तीची बंदी आहे.

पाहा व्हिडिओ –

इतर बातम्या –

Goa Rape Case | गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचार, दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या

मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक

Nagpur | बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें