प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड

पतीला आरोपी पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांविषयी कुणकुण लागली. त्यामुळे त्याने तिला आणि मुलाला बिहारमधील गावी पाठवण्याच प्लॅन आखला. तिला नवऱ्याच्या मनात काय चाललंय, हे समजलं. त्यामुळे तिने ही गोष्टी प्रियकराच्या कानावर घातली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 21, 2021 | 10:07 AM

मुंबई : प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहित महिलेने पोटच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील समता नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आईला अटक केली आहे.

नवऱ्याला महिलेच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण

आरोपी महिला शिवानी (नाव बदलले आहे) हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी संतोष याच्यासोबत झाला होता. दोघेही मूळ बिहारचे रहिवासी आहेत. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी संतोषला शिवानीच्या विवाहबाह्य संबंधांविषयी कुणकुण लागली. त्यामुळे त्याने शिवानी आणि मुलाला बिहारमधील गावी पाठवण्याच प्लॅन आखला.

शिवानीला नवऱ्याच्या मनात काय चाललंय, हे समजलं. तिने ही गोष्टी प्रियकराच्या कानावर घातली. त्यावर त्याने शिवानीला मुंबई सोडण्याचा सल्ला दिला. शिवानीला आपल्या लेकरालाही सोबत घ्यायचं होतं.

नेमकं काय घडलं?

शिवानीने शुक्रवारी सकाळी प्रियकराला आपल्या घराजवळ बोलावलं. त्यानंतर स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने ती मुलाला घेऊन बाहेर पडली. मुलाला प्रियकराच्या ताब्यात देऊन ती घरी परतली. आपला मुलगा कुठे आहे, असं संतोषने शिवानीला विचारलं. त्यावर शिवानीने तो अचानक गायब झाल्याचं सांगितलं. मात्र संतोषचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याने समता नगर पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून लहान मुलाचा शोध

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन संतोष-शिवानीच्या चार वर्षांच्या मुलाचा शोध सुरु केला. शिवानीने तिच्या मुलाला एका तरुणाकडे सोपवताना आपण पाहिलं, असं तपासादरम्यान त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी संशयाच्या आधारावर शिवानीला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. प्रियकराच्या साथीने आपल्या एकुलत्या एका मुलाचं अपहरण केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. शिवानीचं बोलणं ऐकून पोलीसही अवाक झाले.

बोरीवलीत प्रियकराला बेड्या

पोलिसांनी शिवानीचा मोबाईल फोन जप्त केला आणि तिच्या प्रियकराचं लोकेशन ट्रेस केलं. ते बोरीवली स्टेशनजवळ असल्याचं समजताच पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. त्यानंतर शिवानीच्या प्रियकराला बेड्या ठोकत त्याच्या ताब्यातून लहान मुलाची सुटका केली.

संबंधित बातम्या :

बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि…

40 वर्षीय माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत, अहमदनगरमध्ये खळबळ

21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें