AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farm Laws: ‘माझे शब्द लक्षात ठेवा’ मोदींच्या तीन कायदे वापस घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधींचं ते ट्विट पुन्हा चर्चेत

कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करताच, 'माझे शब्द लक्षात ठेवा, सरकारला शेतीविरोधी कायदे परत घ्यावे लागतील' अशी काँग्रेस नेत्याची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. 14 जानेवारीला त्यांनी हे ट्विट केलं होत.

Farm Laws: 'माझे शब्द लक्षात ठेवा' मोदींच्या तीन कायदे वापस घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधींचं ते ट्विट पुन्हा चर्चेत
RAHUL GANDHI
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 11:17 AM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करताच, ‘माझे शब्द लक्षात ठेवा, सरकारला शेतीविरोधी कायदे परत घ्यावे लागतील’ अशी काँग्रेस नेत्याची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. 14 जानेवारीला त्यांनी हे ट्विट केलं होत ज्याला नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधींनीही त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. शेतकऱ्यांच्या विजयाचे त्यांनी अभिनंदनही केले. 2020 मध्ये केंद्राने तीन शेती कायद्ये मंजूर केल्यापासून देशभरातील शेतकरी या विरोधात आंदोलनं करत आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मोदी सरकारला टोमणे देत म्हटले की आगामी निवडणुकांमुळेच हा निर्णय घेतला गेला आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा ही काही धोरणं बदलण्यासाठी किंवा त्यांचे हृदयपरिवर्तन झाले म्हणून केलेली नाही. निवडणुकीच्या भीतीने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे, असं काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. असो, हा शेतकऱ्यांचा आणि शेती कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा मोठा विजय आहे.

दरम्यान, इतर अनेक धोरणात्मक निर्णय अजूनही बाकी आहे्त, आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणाक असल्याचं  शेतकरी नेते म्हणाले.

काय म्हणाले मोदी?

देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, देशाने 2014 मध्ये जेव्हा मला प्रधान सेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही कृषी विकास आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत हे सत्य अनेकांना माहीत नाही. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे आणि लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही बियाणे, विमा, बाजारपेठ आणि बचत यावर सर्वांगीण काम केले. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांसोबतच सरकारने शेतकऱ्यांना नीम कोटेड युरिया, सॉईल हेल्थ कार्ड यांसारख्या सुविधांसह जोडले. सूक्ष्म सिंचन. शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाच्या बदल्यात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक पावले उचलली गेली. देशाने ग्रामीण बाजारपेठेची पायाभूत सुविधा मजबूत केली, असे ते म्हणाले.

हे ही वाचा

Breaking News: शेतकरी आंदोलनासमोर मोदी सरकार झुकलं, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, मोदींनी देशाची माफीही मागितली

Kisan Andolan News: संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत घरी जाणार नाही: मोदींच्या निर्णयानंतरही आंदोलक शेतकरी ठाम

Farm Laws | सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही, हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणालं?

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.