युनिसेफ इंडियाच्या समर्थनार्थ मॅश बॉल 2025 कार्यक्रमाचे आयोजन, वाचा वेळापत्रक
युनिसेफ इंडियाच्या समर्थनार्थ मॅश बॉलची दुसरी आवृत्ती 5 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील सेंट रेजिस येथे आयोजित केली जाणार आहे. यात विविध कला आणि चित्रपटांचे सादरीकरण पहायला मिळणार आहे.

युनिसेफ इंडियाच्या समर्थनार्थ मॅश बॉलची दुसरी आवृत्ती 5 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील सेंट रेजिस येथे आयोजित केली जाणार आहे. यात विविध कला आणि चित्रपटांचे सादरीकरण पहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम मुलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि सर्जनशील सक्षमीकरणासाठी खास असणार आहे.
या कार्यक्रमात कला, डिझाइन, फॅशन आणि हस्तकलेचे प्रदर्शन केले जाणार आहे. MASH च्या संस्थापक आणि कला संरक्षक शालिनी पासी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कलाकारांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढणार आहे.
कार्यक्रमाची माहिती
- स्थळ: द सेंट रेजिस, मुंबई
- तारीख: 5ऑक्टोबर 2025
- वेळ: संध्याकाळी ७ वाजल्यापासून
- थीम: फॅशन इन फिल्म
- विशेष: युनिसेफ इंडियाच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे
मॅश बॉल 2025 – कला आणि मानवतेचा उत्सव
शालिनी पासी यांनी आयोजित आणि संकल्पित केलेला हा कार्यक्रम खुप खास असणार आहे. याद्वारे सामूहिक प्रयत्नांद्वारे भारतातील असुरक्षित मुलांसाठी आशेचा किरण बनण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे व्यासपीठ लोकांना प्रत्येक मुलाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालण्यासाठी मार्गदर्शन करण्यास प्रेरित करत आहे.

कोणते कलाकार सहभागी होणार?
फ्रान्सिस न्यूटन सूझा धुमिमल गॅलरी Untitled ऑइल ऑन बोर्ड, 1964
हे सूझा यांच्या हेड सीरिजचा भाग आहे. ही अशी कला आहे जी मानवी चेहऱ्याला कमकुवतपणा आणि जगण्याच्या मुखवटासारख्या प्रतीकात रूपांतरित करते.
मिशेल पूनावाला
“अॅक्वाविटे”,
कॅनव्हास बोर्डवर अॅक्रेलिक पेंट आणि इतर साहित्याच्या मदतीने कला सादर केली जाणार.

राघव के.के.
“ला लिबर्टे डे ग्वेर्निका”, द ग्वेर्निका प्रोजेक्ट, 2023 व्होल्टे गॅलरी समकालीन कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि युद्धाच्या वेदना प्रतिबिंबित केल्या जाणार
आशिष शाह
कालाघोडा अॅटेलियर आशिष शाह साहित्य: कास्ट अॅल्युमिनियम, काच
विभा गल्होत्रा
“द फायनल फेस्ट”, नेचर मोर्टे गॅलरी
रोको रिची
“Self Portrait Before”

मेधा नंदा, संस्थापक, आर्ट बी अ पार्ट
“कला ही आत्म-अभिव्यक्ती आणि संवादासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे. आमचा उपक्रम स्पार्क (स्पेशल + आर्ट + किड्स) विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देतो.”
नारायण बिस्वास
“पंच मेटल”, प्लेटर गॅलरी, 2024
अॅन कॅरिंग्टन
तारा आर्ट,
स्टेनलेस स्टील कटलरीपासून बनवलेले शिल्प, 2025
रायन कूपमन्स
व्हिडिओ आर्ट
इतर कार्यक्रम
कला-आधारित थेरपी (एबीटी): कलेद्वारे गैर-मौखिक संवाद, उपचार आणि आत्म-अभिव्यक्ती. हे मुलांना मानसिक ताणतणावाचा सामना करण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करते.
अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट (ईसीडी): बालपणाच्या पहिल्या वर्षांवर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक संसाधने प्रदान करतो.
शालिनी पासी यांनी नेटफ्लिक्स शो फॅब्युलस लाईव्हज विरुद्ध बॉलीवूड वाइव्हजमधून मिळणारा संपूर्ण पगार युनिसेफ इंडियाला दान केला.
अविस्मरणीय सायंकाळ
“Fashion in Films” या थीमवर आधारित या कार्यक्रमात जगातल्या प्रमुख कलाकारांना एकत्र आणले जाणार आहे. हा कार्यक्रम सिनेमाची भाषा, स्मृती, ओळख आणि सामूहिक कल्पनाशक्तीमधील तिची भूमिका यावर प्रकाश टाकतो. MASH आणि UNICEF यांचे सेलिब्रिटी आणि जागरूक नागरिकांना जोडून प्रत्येक मुलाला शिक्षण, पोषण, स्वच्छ पाणी, संरक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
हा कार्यक्रम केवळ दृश्य अनुभव नाही तर मुलांचे भविष्य घडवणारी एक चळवळ आहे. या कार्यक्रमाच्या माहितीसाठी तुम्ही hello@mashindia.com या मेल आयडीवर www.mashindia.com या वेबसाईटवर आणि 9870224182, 9512216644 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
