AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिचे स्वप्न अधुरेच राहिले, शेवटच्या क्षणी तिच्या आयुष्याची दोरी तुटली, संपूर्ण गाव हळहळले !

डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती जयपूरहून मिझोरमला शिकायला गेली. स्वप्न पूर्ण व्हायला अवघे काही दिवसच उरले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

तिचे स्वप्न अधुरेच राहिले, शेवटच्या क्षणी तिच्या आयुष्याची दोरी तुटली, संपूर्ण गाव हळहळले !
एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यूImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 14, 2023 | 1:54 PM
Share

जोधपूर : डॉक्टर बनून गावकऱ्यांची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जोधपूरहून मिझोरम येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अनिता नागौर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. जोधपूर शहरातील बीजेएस भागातील रहिवासी असलेली एमबीबीएस विद्यार्थिनी अनिता मिझोरममधील झोरम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे गावातील पहिली मुलगी अनिता हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले होते.

19 मार्चला अंतिम परिक्षा होती

अनिता नागौरच्या मेर्टा तालुक्यातील तालनपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या हे कुटुंब जोधपूरमध्ये राहते. 19 मार्च रोजी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार होती. पण त्याआधी 8 मार्चला अनिताला कॉलेजमध्येच हृदयविकाराचा झटका आला, यात तिचा मृत्यू झाला. अनिता आपल्या गावातील पहिली महिला डॉक्टर होणार होती. 2018 मध्ये तिची NEET मध्ये निवड झाली होती.

गावातील पहिली महिला डॉक्टर बनणार होती

अनिताचे वडील सोजत येथे पोलीस एएसआय म्हणून कार्यरत आहेत. एक भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तर एक भाऊ भारतीय हवाई दलात तैनात आहे. परिक्षा झाल्यानंतर अनिता जोधपूरमध्ये इंटर्नशीप करणार होती. पण त्याआधीच नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. पहिला महिला डॉक्टर होऊन गावात येण्याआधीच तिचा मृतदेह गावात आणण्याची दुर्दैवी वेळ आली.

अनिताचा 8 मार्च रोजी मृत्यू झाल्यानंतर ती शिकत असलेल्या जोरम महाविद्यालयात दुसऱ्या 9 मार्च रोजी परिक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.