भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब, प. बंगाल विधानसभेचं तिकीट नाहीच

मंगळवारी भाजपने जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. (Mithun Chakraborty BJP's Final List )

भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब, प. बंगाल विधानसभेचं तिकीट नाहीच
mithun chakraborty
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 9:23 AM

कोलकाता : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी (West Bengal Assembly Polls) भाजपने अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. मात्र नुकतेच भाजपचा झेंडा हाती धरलेले दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना यादीत स्थान मिळालेलं नाही. रासबिहारी (Rashbehari) विधानसभा मतदारसंघातून मिथुनदा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Mithun Chakraborty Missing From BJP’s Final List For West Bengal Assembly Polls)

रासबिहारी मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा

मंगळवारी भाजपने जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. यामध्ये 13 जणांची नावं आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आलं आहे. साहांनी महत्त्वाच्या काळात भारतीय सैन्यासाठी काश्मीरची खिंड लढवली आहे.

सुवेंदू अधिकारींसाठी मिथुनदा प्रचार करणार

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी 30 मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रोड शो करण्याची चिन्हं आहेत.

मोदींच्या उपस्थितीत मिथुनदांचा पक्षप्रवेश

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये सात मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Mithun Chakraborty Missing From BJP’s Final List For West Bengal Assembly Polls)

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.

संबंधित बातम्या :

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?

मोदींची पश्चिम बंगालमध्ये रॅली, मिथुन चक्रवर्तींचीही ‘एन्ट्री’; पश्चिम बंगालची हवा बदलणार?

(Mithun Chakraborty Missing From BJP’s Final List For West Bengal Assembly Polls)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.