Modi Cabinet Expansion : सहकारातून समृद्धीचं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘सहकार मंत्रालया’ची निर्मिती

सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. तशी घोषणाच आज केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलंय.

Modi Cabinet Expansion : सहकारातून समृद्धीचं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून 'सहकार मंत्रालया'ची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (7 जून) रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. तशी घोषणाच आज केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलंय. (A separate ‘Ministry of Co-operation’ has been created by PM Narendra Modi)

सहकारातून समृद्धीचं आपलं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. हे मंत्रालय देशात सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक पाया उपलब्ध करण्यासाठी काम करेल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासांवर असताना केंद्र सरकारकडून नव्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता या मंत्रालयाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल पुढील 24 तासांच्या आत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी (7 जून) संध्याकाळी साडे पाच वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय. या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे. दरम्यान, राणे आणि पाटील यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या : 

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात कपिल पाटलांना स्थान मिळण्याची शक्यता, कसा आहे राजकीय आलेख?

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

A separate ‘Ministry of Co-operation’ has been created by PM Narendra Modi

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI