AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच, निर्यातीवर बंदी

कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते. | Serum Institute covishield vaccine

केंद्राचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच, निर्यातीवर बंदी
| Updated on: Jan 05, 2021 | 1:07 PM
Share

नवी दिल्ली: सीरमच्या कोव्हिशील्ड (covishield vaccine) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन (Covaxin) या दोन लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुढील काही महिन्यांसाठी सीरमला (Serum) कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नाही. सरकारने या लसीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते. (India will not allow export of Serum Institute covishield vaccine for several months)

‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे १०० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

‘प्रत्येकाचे लसीकरण शक्य नाही, प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल’

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोरोनाची लागण झालेल्या लोकांपर्यंत लस पोहोचवण्यात कोणतीही कसूर राहू नये, या प्रयत्नात आहे.

आम्ही सध्याच्या घडीला केंद्र सरकारला केवळ लस देऊ शकतो. देशाती प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे शक्य नाही. आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल, असे अदर पुनावाला यांनी सांगितले.

‘खुल्या बाजारपेठेत लसीची विक्री नाही’

लसीचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्यातबंदीबरोबरच खुल्या बाजारपेठेतही लसींची विक्री करण्यास ‘सीरम’ला मनाई करण्यात आली आहे. आम्हाला सरकारच्या निर्देशांचे पालन करावे लागेल. ही लस आम्हाला गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवायची असल्याने आम्ही सरकारच्या या निर्णयाचा आदर करतो, असे पुनावाला यांनी सांगितले.

‘भारताच्या निर्णयामुळे विकसनशील देशांना करावी लागणार प्रतिक्षा’

कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर विकसित देशांनी अगोदरच लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी आगाऊ करार करून कोट्यवधी कुप्या स्वत:साठी राखून ठेवल्या होत्या. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून प्रामुख्याने विकसनशील देशांसाठी डोस तयार केले जातात. भारताने निर्यातबंदी केल्याने गरीब देशांना आणखी काही काळ लसीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या:

जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी

(India will not allow export of Serum Institute covishield vaccine for several months)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.