मोहम्मद शमीची पत्नी पुन्हा चर्चेत,’भारताचं नाव बदला…’हसीन जहांचं पंतप्रधान मोदींना आवाहन

हसीन जहाँने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खास आवाहन केलं आहे. आपला देश, आमचा सन्मान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असे असले पाहिजे.

मोहम्मद शमीची पत्नी पुन्हा चर्चेत,'भारताचं नाव बदला...'हसीन जहांचं पंतप्रधान मोदींना आवाहन
हसीन जहॉ
राजेंद्र खराडे

|

Aug 14, 2022 | 8:10 PM

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान (Bowler) गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी (Hasin Jahan) हसीन जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत ही असतेच. मध्यंतरीच त्या दोघांमधील वादावरुन सोशल मिडियामध्ये चर्चेचा विषय बनला होता, असे असतानाच (India Name) इंडियाचे नाव हे भारत किंवा हिंदुस्थान ठेवण्याचे आवाहन तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे. त्यामुळे तिच्या या अजब मागणीमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात भारताला इंडिया किंवा भारत संबोधलं जाईल असं म्हटलं आहे. तरीही शमीच्या बायकोने इंडियाचं नाव भारत ठेवण्याची मागणी केली आहे.

नेमके काय म्हणाली हसीन जहॉ

हसीन जहाँने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खास आवाहन केलं आहे. आपला देश, आमचा सन्मान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असे असले पाहिजे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भारताचे नाव बदलण्याची विनंती केलीआहे. जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत बनवेल असेही ती म्हणाली आहे.

मोहम्मद शमी अन् हसीन जहांमध्ये वाद

हसीन जहां आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. वर्ष 2018 मध्ये दोघांमध्ये वाद झाला होता, त्यात हसीन जहाँने शमीला मारहाण केली. मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. 2018 साली हसीन जहांने मोहम्मद शमीवर आरोप केले होते, इतकंच नाही तर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप झाला होता.हसीन जहां मॉडेल आहे, ती इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. जे खूप व्हायरल आहेत. हसीन जहांचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स.

मोहम्मद शमीही टीमच्या बाहेर

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमधून बाहेर आहे. भारतीय संघाला आशिया कप खेळायचा असून टी-20 प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत मोहम्मद शमीला स्थान मिळालेले नाही. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां हिच्याबद्दल बोलायचं झालं तर ती चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें