AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक घोट पाण्याची किंमत 100 रुपये, ‘या’ देशात पाण्याला सोन्यासारखा भाव

जगात असे काही देश आहेत जिथे सोन्याच्या दरात पाणी विकले जाते. स्वित्झर्लंडमध्ये एक लिटर पाण्याची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर भारतात हे पाणी काही पैशांना मिळते.

एक घोट पाण्याची किंमत 100 रुपये, ‘या’ देशात पाण्याला सोन्यासारखा भाव
पाण्याच्या घोटाला सोन्यासारखा भावImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Updated on: Apr 19, 2025 | 1:52 PM
Share

तुम्ही कधी विचार केला आहे का की, जे पाणी तुम्ही भारतात काही रुपये देऊन सहज विकत घेतात, तेच पाणी जगातील काही देशांमध्ये इतके महाग विकले जाते की, तुम्हाला ऐकून धक्का बसेल. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकजण बाटलीतून पाण्याचा घोट घेऊन फेकून देतात, पण हेच पाणी इतर कुठल्या तरी देशात खूप मौल्यवान आहे. कल्पना करा, पाण्याची बाटली विकत घ्यायला गेलात आणि तुम्हाला 300-400 रुपयांचं बिल आलं तर कसं वाटेल? अहो. असंच काहीसं अनेक देशांमध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

सर्वात महाग पाणी कुठे विकले जाते?

स्वित्झर्लंड ही जगातील सर्वात महागड्या पिण्याच्या पाण्याची बाजारपेठ आहे. येथे 330 मिलीच्या छोट्या बाटलीची किंमत सुमारे 347 रुपये आहे. लिटरमध्ये मोजले तर एक लिटर पाण्याची किंमत सुमारे 1050 रुपये आहे. म्हणजे तिथे राहून रोज फक्त एक लिटर पाणी विकत घेतलं तर महिन्याभरात फक्त पाण्यावर 30 हजार रुपये खर्च होतील.

भारतात पाणी किती स्वस्त?

आता आपण भारताबद्दल बोलूया. भारतात मिनरल वॉटरच्या बाटलीची सरासरी किंमत 20 ते 25 रुपये आहे. आणि नळाचे पाणी वापरले तर ते आणखी स्वस्त आहे. उदाहरणार्थ, मुंबईसारख्या मोठ्या शहरात एक लाख लिटर पाण्याचे बिल केवळ 525 रुपये येते. म्हणजे इथल्या एक लिटर पाण्याची किंमत एक पैशापेक्षाही कमी आहे.

एवढा फरक कशासाठी?

याची कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडसारख्या देशात पाणी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान महाग आहे, मजुरी जास्त आहे आणि नैसर्गिक स्त्रोतांचे पाणी सहजासहजी मिळत नाही. दुसरीकडे, भारतात पाण्याचे स्त्रोत अधिक आहेत आणि सरकार देखील पाण्याचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करते.

महिन्याभरात फक्त पाण्यावर 30 हजार रुपये

स्वित्झर्लंडमध्ये लिटरमध्ये मोजले तर एक लिटर पाण्याची किंमत सुमारे 1050 रुपये आहे. म्हणजे तिथे राहून रोज फक्त एक लिटर पाणी विकत घेतलं तर महिन्याभरात फक्त पाण्यावर 30 हजार रुपये खर्च होतील. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकजण बाटलीतून पाण्याचा घोट घेऊन फेकून देतात, पण हेच पाणी इतर कुठल्या तरी देशात खूप मौल्यवान आहे. या तुलनेतून पाण्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेतले पाहिजे आणि ते कधीही वाया घालवू नये.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.