AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त किंचाळ्या सुरु होत्या… दर्शन घेऊन बाहेर पडताच चेंगराचेंगरी, 8 भक्तांचा मृत्यू; अनेकजण जखमी

चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शेकडो भाविक दर्शनाला आले होते. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर येताच एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली

फक्त किंचाळ्या सुरु होत्या... दर्शन घेऊन बाहेर पडताच चेंगराचेंगरी, 8 भक्तांचा मृत्यू; अनेकजण जखमी
| Updated on: Mar 31, 2026 | 11:53 AM
Share

बिहारच्या नालंदामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आज नालंदाच्या शीतला देवी मंदिराच्या परिसरात भाविकांचा जनसागरच उसळला. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शेकडो भाविक दर्शनाला आले होते. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर येताच एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात 8 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यावेळी भक्तांचा एकच आक्रोश सुरू होत्या. जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या किंचाळ्या सुरू होत्या. चेंगराचेंगरी होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.

ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील दीपनगर पोलीस स्टेशन क्षेत्रातील मघड़ा येथील प्रसिद्ध शीतला मंदिरात घडली. येथे प्रत्येक मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक पूजा-अर्चना करण्यासाठी येतात. स्थानिक लोकांच्या मते, सकाळपासूनच मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी जमली होती. या दरम्यान गर्दी नियंत्रणाची पुरेशी व्यवस्था नव्हती, ज्यामुळे परिस्थिती हळूहळू अनियंत्रित झाली.

प्रथम धक्काबुक्की, नंतर चेंगराचेंगरी

प्रत्यक्षदर्शींच्या मते, पूजेदरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली, जी काही क्षणातच चेंगराचेंगरीत रूपांतरित झाली. लोक एकमेकांवर पडू लागले आणि बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अफरा-तफरी माजली. यावेळी अनेक श्रद्धाळू गंभीर जखमी झाले आणि दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाठवण्यात आल्या. त्यांच्या मदतीने जखमींना तातडीने नालंदा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची टीम जखमींचे उपचार करत आहेत, तर गंभीर जखमींना चांगल्या उपचारासाठी रेफर करण्याची तयारी देखील सुरू आहे.

मंदिर परिसर रिकामा करण्यात आला

घटनेच्या नंतर प्रशासनाने मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा केला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. घटनास्थळी एसडीएमसह इतर वरिष्ठ अधिकारी देखील पोहोचले आणि संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली.

प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. स्थानिक लोकांचाही आरोप आहे की प्रत्येक मंगळवारी येथे प्रचंड गर्दी असते, तरीही प्रशासनाकडून पुरेसे व्यवस्थापन केले जात नाही. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...