AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 मोठे निर्णय, पाकिस्तानला 3 वॉर्निंग, मोदी नेमकं काय म्हणाले? भाषणातले 5 मोठे मुद्दे!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पहलगामच्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानतंर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत.

3 मोठे निर्णय, पाकिस्तानला 3 वॉर्निंग, मोदी नेमकं काय म्हणाले? भाषणातले 5 मोठे मुद्दे!
narendra modi speech highlights
| Updated on: May 12, 2025 | 10:09 PM
Share

Narendra Modi Speech : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पहलगामच्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानतंर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. असे असतानाच आता मोदी यांनी देशाला संबोधित करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी तीन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या याचं संबोधनातील पाच महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या…

1) पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानचं सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाल खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवेल. पाकिस्तानला वाचायचं असेल तर टेरर इन्फ्रास्ट्रक्चरला संपवावं लागेल. त्याशिवाय शांतीचा अन्य कोणताही मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. टेरर आणि टॉक एकसाथ होणार नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही, पाणी आणि खून एक साथ वाहू शकत नाही, असं मोदी यांनी ठणकावून सांगितलं.

2) मी आज विश्वालाही सांगेल की, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावरच होईल. चर्चा होईल तर पीओकेवरही होईल. प्रिय देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने शांतीचा रास्ता दाखवला आहे. शांतीचा मार्गही शक्तीने जातो. मानवता, शांती समृद्धीकडे जातो. प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसात भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा भारताची सैन्य आणि सशस्त्र बलाला सॅल्यूट करतो, असे मोदी म्हणाले.

3) भारताचे तिन्ही दलाने, बीएसएफ, अर्ध सैनिक दल सतत अलर्टवर आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लाईन खेचली आहे. पहिली म्हणजे, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर देणार. आमच्या पद्धतीने आमच्या अटीवर उत्तर देणार. जिथून दहशतवादी निर्माण होतात त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करणार, असंही मोदी यांनी सांगितलं.

4) भारताच्या या हल्ल्यात 100 हून अधिक खतरनाक अतिरेक्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचे अनेक आका गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते. भारताविरोधात कट रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात ठार केलं. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान घोर नैराश्यात आला होता. हताश झाला होता. घाबरला होता. त्यामुळेच त्याने दुसरी चूक केली. त्याने दहशतवादविरोधातील भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्ताने आपल्या स्कूल, कॉलेज, गुरुद्वार, मंदीर आणि नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाण्यांना निशाना बनवलं. पण यातही पाकिस्तानचा पर्दाफाश झाला, असा हल्लाबोल मोदी यांनी केला.

5) जगाने पाहिलं की कसं पाकिस्तानचे ड्रोन, पाकिस्तानचे मिसाईल भारताच्या समोर नेस्तनाबूत झाले. भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टिमने त्याला आकाशातच नेस्तनाबूत केलं. पाकिस्तानला सीमेवर वार करायचा होता. पण भारताने पाकिस्तानच्या छातीत वार केला. भारताचे ड्रोन आणि मिसाईलने योग्य त्या ठिकाणी वार केले. पाकिस्तानच्या एअरबेसवर वार केले. या एअरबेसवर पाकला गर्व होता. पहिल्या तीन दिवसातच भारताने पाकिस्तानला एवढं बरबाद केलं की पाकिस्तानला त्याचा अंदाज नव्हता. भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने 10 मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं. अनेक अतिरेकी मारले होते, असे मोदी यांनी सांगितले.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.