AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी, कुठे म्हणायचे? केंद्र सरकारने जारी केली नवी नियमावली

National Anthem Rules : राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादरीकरण करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कोणत्या प्रसंगी गायले किंवा वाजवले जावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी, कुठे म्हणायचे? केंद्र सरकारने जारी केली नवी नियमावली
National Anthem RuleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 10, 2026 | 10:35 PM
Share

देशातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादरीकरण करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कोणत्या प्रसंगी गायले किंवा वाजवले जावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे निर्देश सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना पाठविण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या प्रसंगी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादर करायचे?

गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कोणत्या प्रसंगी अनिवार्यपणे गायले किंवा वाजवले जावे, तसेच कोणत्या प्रसंगी ते सादर करता येईल, याची संपूर्ण यादी दिली आहे. याशिवाय, एका कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्ही कधी सादर करता येतील, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही सादर केले जाऊ शकतात. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्ही एकत्र सादर करायचे असल्यास प्रथम राष्ट्रगीत आणि त्यानंतर राष्ट्रगान सादर करावे.

राज्यगीत असलेल्या राज्यांसाठीही सूचना

ज्या राज्यांमध्ये राज्यगीत आहे, तेथे राज्यगीतही राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानासोबत सादर करता येईल. मात्र अशा वेळीही क्रम कायम ठेवणे आवश्यक असून, सर्वप्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर राष्ट्रगान आणि त्यानंतर राज्यगीत सादर करण्याच्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच सर्वप्रथम वंदे मातरम, त्यानंतर जन गण मन आणि त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणावे लागणार आहे.

योग्य उच्चार आणि शब्दांवर भर

गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादर करताना योग्य लिपी, अचूक शब्द, स्पष्ट उच्चार आणि योग्य सादरीकरण याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सुलभतेसाठी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा अधिकृत मजकूर आणि योग्य उच्चार गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

संस्था आणि विभागांना काटेकोर पालनाचे निर्देश

गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्था आणि संघटनांना या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्याचे आवाहन केले आहे. या निर्देशांच्या प्रती राष्ट्रपती सचिवालय, उपराष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, भारत निवडणूक आयोग, संसद सचिवालय, सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये, नीती आयोग तसेच इतर घटनात्मक आणि सरकारी संस्थांना पाठविण्यात आल्या आहेत.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका