AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 5 खासदारांचा आज सन्मान होणार

Sansad Ratna Award Announced : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यात शरद पवार गटाच्या दोन खासदारांचा, शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. शिवाय भाजपच्या एका खासदाराचा समावेश आहे. पाहा यादी...

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 5 खासदारांचा आज सन्मान होणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Feb 17, 2024 | 11:40 AM
Share

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्कारांच्या मानकरींची यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराचा या पुस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे. आज या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

संसदरत्न पुरस्काराचं आज वितरण

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. तर पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदाराचाही यात समावेश आहे. या खासदारांना आज पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

कुणा-कुणाला पुरस्कार जाहीर?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे.

संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. भाजपचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचाही आज सन्मान केला जाणार आहे.

पुरस्काराची पार्श्वभूमी

भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. 2010 ला या पुरस्काराचं अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केलं. दर वर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा सात जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यानंतर आज हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...