AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘न्यायपालिका करप्ट आहे हे तुम्हाला शिकवायचं आहे का?’, NCERT वर भडकले चीफ जस्टिस

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार आणि NCERT च्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिलं की, "हा अध्याय तयार करणाऱ्या दोन व्यक्तींना यापुढे भविष्यात कुठल्याही मंत्रालयाच्या कामात सहभागी करुन घेणार नाही. सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेतेय हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं"

'न्यायपालिका करप्ट आहे हे तुम्हाला शिकवायचं आहे का?', NCERT वर भडकले चीफ जस्टिस
supreme court
| Updated on: Feb 26, 2026 | 1:04 PM
Share

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकात न्यायपालिकेतील करप्शनशी संबंधित एका धड्याचा समावेश करण्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्वत: याची दखल घेत सुनावणी घेतली. या बेंचमध्ये चीफ जस्टिस डीवाय जाधव यांच्याजागी चीफ जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमाल्या बागची आणि विपुल मनुभाई पंचोली यांचा समावेश होता. सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी या निर्णयावर कठोर टीका केली. “हे न्यायपालिकेवर पहिली गोळी चालवण्यासारखं आहे. आज न्यायपालिका मीडियामध्ये रक्तरंजित दिसतेय. हा गंभीर चिंतेचा विषय आहे” असं ते म्हणाले. ‘जर, हे पुस्तक बाजारात, सोशल मीडियावर उपलब्ध आहे मग प्रकाशन मागे घेणं कशाप्रकारे प्रभावी होईल?’ असा प्रश्न चीफ जस्टिसनी विचारला. ‘न्यायपालिका भ्रष्ट आहे हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं, तर यामुळे समाजात भ्रम पसरेल, चुकीचा संदेश जाईल’ असं सुद्धा ते म्हणाले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार आणि NCERT च्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिलं की, “हा अध्याय तयार करणाऱ्या दोन व्यक्तींना यापुढे भविष्यात कुठल्याही मंत्रालयाच्या कामात सहभागी करुन घेणार नाही. सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेतेय हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं”

सरकारने काय आश्वासन दिलं?

या धड्यासंदर्भात डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेलं वादग्रस्त साहित्य हटवण्यासाठी सरकारने आवश्यक पावलं उचलावीत असं सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं. संबंधित मंत्रालयाला टेकडाउन आदेश देण्याची वैधानिक शक्ती आहे असं सॉलिसिटर जनरलने सांगितलं. “जबाबदारी कोणाची हे ठरत नाही, तो पर्यंत कार्यवाही बंद होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल” असं कोर्टाने स्पष्ट केलं. सरकारने सुद्धा कुठलीही प्रतिकुल भूमिका घेणार नाही, न्यायालयाचं समाधान होईपर्यंत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

लोकांना काय वाटतं हे मुलांना समाजवण्याचा प्रयत्न

न्यायापालिकेची बदनामी करणं हा या अध्यायामागे सरकार आणि NCERT चा उद्देश नव्हता असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. न्यायाला विलंब झाल्यानंतर लोकांना काय वाटतं हे मुलांना समाजवण्याचा प्रयत्न होता असं सरकारकडून सांगण्यात आलं.

एफआयआर दाखल करण्याचा अधिकार, पण...; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
एफआयआर दाखल करण्याचा अधिकार, पण...; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?.
रोहित पवारांची तक्रार घेतली गेली नाही तर...; शशिकांत शिंदेंचं वक्तव्य
रोहित पवारांची तक्रार घेतली गेली नाही तर...; शशिकांत शिंदेंचं वक्तव्य.
शिंदेसेनेचे आमदार व्हीएसआर विमाने वापरणार नाही!
शिंदेसेनेचे आमदार व्हीएसआर विमाने वापरणार नाही!.
आम्ही जिवंत असेपर्यंत दादांच्या...; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य
आम्ही जिवंत असेपर्यंत दादांच्या...; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य.
गेल्या 50 मिनिटांपासून रोहित पवारांची पोलिसांसोबत चर्चा सुरू
गेल्या 50 मिनिटांपासून रोहित पवारांची पोलिसांसोबत चर्चा सुरू.
रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन! नेमकं कारण काय?
रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन! नेमकं कारण काय?.
भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय
भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय.
सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार
सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार.
धक्कादायक... फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध
धक्कादायक... फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध.
एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक
एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक.