Corona Cases in India | मोठा दिलासा ! 44 दिवसांनंतर देशात कोरोनाग्रस्तांमध्ये निचांकी आकडे, कोरोनाबळींतही घट

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर गेला आहे. (186364 Corona Cases in India )

Corona Cases in India | मोठा दिलासा ! 44 दिवसांनंतर देशात कोरोनाग्रस्तांमध्ये निचांकी आकडे, कोरोनाबळींतही घट
Corona

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 25 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 86 हजार 364 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 44 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 660 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे. (New 186364 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 86 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 660 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 59 हजार 459 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर गेला आहे. देशात 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 18 हजार 895 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 23 लाख 43 हजार 152 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण –1,86,364

देशात 24 तासात डिस्चार्ज –2,59,459

देशात 24 तासात मृत्यू –3,660

एकूण रूग्ण –  2,75,55,457

एकूण डिस्चार्ज –2,48,93,410

एकूण मृत्यू – 3,18,895

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 23,43,152

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,57,20,660 (186364 Corona Cases in India )

संबंधित बातम्या :

 लसीकरणावरुन विरोधकांचे मोदी सरकारला सवाल, नीती आयोगाकडून 7 प्रश्नांची उत्तरं

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो”, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम

(New 186364 Corona Cases in India in the last 24 hours)