पैलवानांच्या आंदोलनाला रामदेवबाबांचं समर्थन; थेट केली बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी

Baba Ramdev on Wrestlers Protest : बृजभूषण सिंह यांना अटक करा; बाबा रामदेव यांची मागणी

पैलवानांच्या आंदोलनाला रामदेवबाबांचं समर्थन; थेट केली बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 12:39 PM

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन केलं जात आहे. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह अन्य पैलवान दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. याला बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर आंदोलकांच्या मागणीचंही त्यांनी समर्थन केलं आहे.

बृजभूषण शरण सिंह आजकाल महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं करत आहेत. त्यांची वक्तव्य अतिशय निंदनीय आहेत. हे पाप आहे. अशा लोकांना लगेच जेलमध्ये पाठवलं पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह अन्य पैलवान 23 एप्रिलपासून जंतर मंतरवर पैलवान आंदोलन करत आहेत. मागच्या महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहेत. भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचबरोबर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जंतर-मंतर मैदानावर जात या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली आहे. आता बाबा रामदेव यांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जेपी नड्डा यांनी मला सांगितलं तर मी लगोलग राजीनामा देईल, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. बृजभूषण सिंह हे सहा वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्या पत्नीदेखील खासदार होत्या. त्यांचा मुलगाही आमदार आहे. आता त्यांच्या राजीनाम्यासह अटकेची मागणी होत आहे.

दरम्यान, नव्या संसद भवनाचं 28 मेला म्हणजे उद्या उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी या पैलवानांनी महापंचायतीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कसं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.