AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : भारताचे बिझनेस कल्चरल कसं बदलतेय, Shark गझल अलघ आणि विनीता सिंह देणार माहीती

भारतात स्टार्टअपची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवे बिझनेस कल्चर वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक तरूण आता बिझनेसमध्ये उतरत आहेत. त्यामुळे बिझनेसच्या नव्या आयडीया संदर्भातील या टीव्ही शोला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. यासंबंधी TV9 च्या What India Thinks Today कॉन्क्लेव्हमध्ये दोन शार्क्स बिझनस वुमन गझल अलघ आणि विनीता सिंह उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत.

What India Thinks Today : भारताचे बिझनेस कल्चरल कसं बदलतेय, Shark गझल अलघ आणि विनीता सिंह देणार माहीती
News 9 global summit 2024 Shark Tank India female Ghazal Alagh and Vineeta Singh will present their thoughts ​Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 1:26 PM

नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : देशाची राजधानी दिल्लीत देशाचे नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 ची कॉन्क्लेव्ह What India Thinks Today ची महापरिषद रविवार 25 फेब्रुवारीपासून होत आहे. अलिकडेच नवा टीव्ही शो ‘Shark Tank India’ ला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे भारत हा नवा बिझनेस सेंटर म्हणून पुढे येत आहे हे स्पष्ट होत आहे. व्यवसाय करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. आता नोकरी मागण्याऐवजी नोकरी देण्याकडे तरुण पिढी वळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला आर्थिक शक्ती बनविण्याच्या व्हीजनशी हे सुसंगत आहे. देशाची राजधानी होणाऱ्या TV9 न्यूज नेटवर्कच्या भरणाऱ्या परिषदेत दोन शार्क्स सामील होणार आहेत. गझल अलघ आणि विनीता सिंह या दोन शार्क्स बिझनस वुमन आपले विचार मांडणार आहेत. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चा सेंकड सिझन दिल्लीतील अशोका हॉटेल येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या महापरिषदेत अनेक हस्ती एक साथ व्यासपीठावर दिसतील.

विनीता सिंह

शुगर कॉस्मेटीक्स सारख्या ब्रॅंडची सुरुवात करणाऱ्या विनीता सिंह शार्क टॅंक इंडीयाच्या तीन सिझनमध्ये दिसणाऱ्या निवडक शार्क्सपैकी एक आहेत. आयआयटी मद्रास आणि आयआयएम अहमदाबाद सारख्या इन्स्टीट्यूटमधून शिक्षण घेणाऱ्या विनीता सिंह यांनी 2007 साली आपली कारकीर्द सुरु केली. शुगर कॉस्मेटिक्सच्या आधी त्यांनी दोन आणखी स्टार्टअप सुरु केले होते. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पती सोबत शुगर कॉस्मेटिक्स लॉंच केले. WITT 2024 मध्ये विनीता सिंह या महिलांचं बिझनेसमध्ये पुढे येण्याचा आपला अनुभव कथन करतील.  या चर्चासत्रात त्या कंपन्यांच्या बोर्ड रुममध्ये आता महिलांचा सहभाग कसा वाढत आहेत याविषयी देखील माहीती देतील.

गझल अलघ

मुळच्या हरियाणाच्या असलेल्या गझल अलघ यांनी देखील ‘Mamaearth’ ला एक यशस्वी ब्रॅंड म्हणून स्थापन करण्यापूर्वी अनेक स्टार्टअपची सुरुवात केली होती. ‘मामाअर्थ’ ला भारताचा पहिला ‘टॉक्सिन फ्री’ बेबीकेअर ब्रॅंड म्हणून स्थापित केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही. शार्क टॅंक इंडीयाच्या पहिल्या सिझनमध्ये दिसलेल्या गझल अलघ यांची शिक्षण पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये झाले होते. देशात वेगाने पसरणाऱ्या स्टार्टअप कल्चर संबंधीच्या WITT 2024 च्या चर्चासत्रात गझल अलघ सहभागी होतील. त्यांच्यासह नो ब्रोकरचे को-फाऊंडर अखिल गुप्ता देखील सहभागी असतील.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.