India-China: चिनी सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी आता नवा प्लॅन, भारतीय सैनिकांना मिळतायेत इस्रायली मार्शल आर्टचे धडे

सेनेच्या उत्तरी कमांडकडे जम्मू काश्मीरपासून ते लडाखपर्यंत एलओसी आणि एलएसीची जबाबदारी आहे. एलएसीवर चिनी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सैनिकांना, इस्रायली मार्शल आर्ट कर्व मागाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

India-China: चिनी सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी आता नवा प्लॅन, भारतीय सैनिकांना मिळतायेत इस्रायली मार्शल आर्टचे धडे
मार्शल आर्टचे धडे Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 5:46 PM

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (Actual Line of Control) चीनशी (China)तणावाचा प्रसंग आला तर तिथे शस्त्राने लढाई करता येत नाही. त्यामुळे अनाआर्म्ड कॉम्बोट (विना हत्यारांची लढाई)साठी भारतीय सैन्यदलातील जवानांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे. पूर्व कमांडमध्ये यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. आता सैन्यदलाच्या उत्तर कमांडमध्येही एलएसीवर तैनात असलेल्या सैनिकांना विनाशस्त्र लढाईचे प्रशिक्षण देण्यात येते आहे. पहिल्यांदाच या प्रशिक्षणाला संघटित स्वरुपात सुरुवात करण्यात आली आहे. सेनेच्या उत्तरी कमांडकडे जम्मू काश्मीरपासून ते लडाखपर्यंत एलओसी आणि एलएसीची जबाबदारी आहे. एलएसीवर चिनी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सैनिकांना, इस्रायली मार्शल आर्ट (Martial Art)कर्व मागाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

का जाणवली मार्शल आर्ट प्रशिक्षणाची गरज ?

एलएसीवर चिनी सैनिक आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले तर धक्काबुक्की आणि हाणामारीच्या घटना घडत असत. भारतीय सैन्य़ातील जवान यासाठी तयार असत, आता त्यांना मार्शल आर्ट शिकवण्यात येते आहे. विशेष करुन गलवानमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर याची गरज जास्तपणे जाणवू लागली. त्यामुळे आता संघटित स्वरुपात युनिट स्तरावरील सैनिकांना इस्रायली मार्शल आर्ट कर्व मागा शिकवण्यात येते आहे. यामुळे सैनिकांमधील आत्मविश्वास वाढणार आहे. तसेच चिनी सैनिकांशी समोरासमोर लढण्याची वेळ आलीच तर त्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी हे सैनिक तयार असतील. सध्याच्या कोअर बॅटल स्कूलच्या प्रशिक्षणात मोठा बदल करण्यात आलेला नाही. मात्र थ्रेट बेस्ड ट्रेनिंग (धोक्यांच्या स्थितीप्रमाणे प्रशिक्षण) यात हळूहळू बदल करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

सैनिकांचा आत्मविश्वास वाढणार

भारत आणि चीन यांच्यातील प्रोटोकॉलनुसार आणि झालेल्या करारांनुसार, एलएसीवर पेट्रोलिंगच्या वेळी दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी तणाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. गोळीबाराची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे एलएसीवर शस्त्रांचा वापर न होता धक्काबुक्की किंवा मारहाणीचे प्रकार दोन्ही सैन्यदलात घडतात. चिनी सैन्य जेव्हा या भागात पेट्रोलिंगसाठी येते तेव्हा त्यांच्याकडे शस्त्रे नसतात मात्र दंडुके, करंट देणारी छडी, पेपर स्प्रे अशी उपकरणे असतात. संयम पाळण्याचा पूर्ण प्रयत्न भारतीय सैन्याकडूनही करण्यात येतो. मात्र चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही सैन्यदलात हाणामारीच्या घटना घडतात. अशा स्थितीत मार्शल आर्टच्या ट्रेनिंगने भारतीय सैनिकांची शक्ती आणि आत्मविश्वास या दोन्हीतही भरच पडणार आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.