AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : हे आत्मघाती ड्रोन्स पाहताच दहशतवाद्यांना आठवला अब्बा, झडप घालून केला खात्मा, या Drones ची जोरदार चर्चा

Loitering Munition Suicide Kamikaze Drones : भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानलाच नाही तर दहशतवाद्यांना पण इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कारवाईपूर्वी जगातील अनेक राष्ट्रांचे पाठबळ भारताने मिळवले. पाकिस्तान अजूनही हल्ल्याच्या धक्क्यातून बाहेर आलेला नाही.

Operation Sindoor : हे आत्मघाती ड्रोन्स पाहताच दहशतवाद्यांना आठवला अब्बा, झडप घालून केला खात्मा, या Drones ची जोरदार चर्चा
आत्मघाती ड्रोन्सची चर्चाImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2025 | 3:00 PM
Share

भारताने बुधवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवण्यात आला. भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लोइटरिंग म्यूनिशन या आत्मघातकी ड्रोन्सचा वापर केला. भारतीय पायदळ, हवाईदल, नवदल यांनी संयुक्त कारवाई केली. अगदी अचूकपणे दहशतवादी ठिकाणे टिपण्यात आली. भारतीय गुप्तहेर संघटनांनी चोख कामगिरी बजावत दहशतवादी ठिकाणांची माहिती दिली. भारतीय आर्मीने ही संपूर्ण कामगिरी बजावली.

काय आहे आत्मघाती ड्रोन्स?

लोईटरिंग म्युनिशन या ड्रोन्सला आत्मघाती अथवा कामीकेज ड्रोन्स असे पण म्हटले जाते. हे LMS ड्रोन अनमॅन्ड एरिअल ड्रोन्स आहे. या ड्रोन्सची एक खासियत आहे, हे त्याच्या टार्गेटवर आकाशात फिरत असते. जेव्हा त्याला कमांड मिळते, तेव्हा ते ठिकाण अचूकपणे टिपते. ते उद्धवस्त करते. हे ड्रोन्स त्याच्या अचुकतेसाठी प्रसिद्ध आहे.

या आत्मघाती ड्रोनचा आकार पेलोड आणि वारहेड वेगवेगळे आहेत. लोईटरिंग म्यूनिशन हे एकदाच वापरण्यात येतात. कारण हे अचूक लक्ष्यावर पडताच फुटून सर्व काही उद्धवस्त करतात. आत्मघाती ड्रोन्सचा सर्वात अगोदर वापर 1980 मध्ये करण्यात आला होता. पण 1990 आणि 2000 च्या दशकात त्याचा वापर वाढला. यमन, इराक, सीरिया आणि युक्रेन येथील युद्धात या ड्रोन्सचा वापर अधिक प्रमाणात झाला. तर 2021 मध्ये काही व्यापारी जहाजांना या आत्मघाती ड्रोन्सने लक्ष्य केले होते.

पाकिस्तानातील 9 ठिकाणं उद्धवस्त

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयब्बाचे ठिकाण, चक अमरू, सियालकोट, भीमबेर, गुलपूर, कोटली, बाघ आणि मुझफ्फराबादचा परिसराचा समावेश आहे. या दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मध्यारात्री 1.44 वाजता ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.

या कारवाईची गरज काय?

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 25 पर्यटकांसह एका नेपाळी नागरिकांचे प्राण गेला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत या हल्ल्याचा बदला घेईल हे स्पष्ट केले होते. 29 एप्रिल रोजी सैन्याचे तीन प्रमुख, सीडीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासह मंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर हा बदल कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा याविषयीची सूट लष्कराला दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर भारत हल्ला करणार हे उघड झाले होते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.