Operation Sindoor : जशी तयारी केली, लष्कराने…पहलगामचा बदला घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची खणखणीत प्रतिक्रिया
PM Narendra Modi Big Reaction : आज मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यात दहशतवादी अड्डे टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. जशी तयारी केली, लष्कराने... या त्यांच्या वक्तव्यावर तुफान समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.

आज 7 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपासून ते भल्या पहाटेपर्यंत पाकिस्तानमध्ये दणादण मिसाईल डागण्यात आल्या. भारताने मध्यरात्री पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणे उद्धवस्त करण्यात आली. यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे आक्का नरकात पाठवण्यात आले. या हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधानांनी पाकिस्तानविरोधातील कारवाईची माहिती मंत्री गटाला दिली.
भारतीय लष्कराची थोपटली पाठ
यावेळी पंतप्रधानांनी भारतीय लष्कराचे तोंडभरून कौतुक केले. भारतीय लष्कराने कोणतीही चूक न करता, तयारीप्रमाणे कारवाई केली. ही आपल्यासाठी अभिमानाची वेळ आहे. त्यांनी लष्कराचे कौतुक केले. कॅबिनेटच्या सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश एकवटल्याचे सांगितले.
100 दहशतवादी ठार
मध्यरात्री भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तान पुरता हादरला. भारतीय लष्काराने एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल डागले. मुरीदके येथील लष्कर-ए-तैयब्बाचे मुख्यालय, बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे लाँचिंग पॅड आणि इतर ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली. या हल्ल्यात 100 दहशतवादी ठार झाले.
25 मिनिटांत 21 ठिकाणांवर हल्ला
भारताने मध्यरात्री पाकिस्तानविरोधात कारवाई केली. या मोहिमेची परराष्ट्र सचिव आणि लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली की, लष्कराने 6 आणि 7 मे रोजीदरम्यान रात्री 1 वाजून 5 मिनिट ते दीड वाजेच्या दरम्यान हल्ला करण्यास सुरूवात केली.
भारतीय लष्काराने मरकज सुभान अल्लाह ते सयदना बिलाल कॅम्पपर्यंत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली. 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. मरकज सुभान अल्लाह ते सयदना बिलाल कॅम्पपर्यंत दहशतवादी टिपण्यात आले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर आणि मुरीदके हे लक्ष्य होतं. राजस्थानच्या सीमेजवळ असलेलं बहावलपूर हे मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी गटाचा बालेकिल्ला होता. त्यावर थेट मिसाईल हल्ला करण्यात आला. लाहोरमधील मुरीदके या शहरातील लष्कर-ए-तैयबाचं तळ उद्धवस्त करण्यात आले.
