भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील 15 जिल्हे पाकिस्तानच्या ‘टार्गेट’वर, पाहा संपूर्ण यादी
Poonch Attack India Pakistan Tension: पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि स्थानिक प्रशासनाला २४ तास देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोबाईल नेटवर्क, रुग्णालये, शाळा आणि प्रशासकीय सेवा सज्ज ठेवल्या आहेत.

Poonch Attack India Pakistan Tension: भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय लष्कराने राबवली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील पुंछ भागात सातत्याने गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. त्यात भारताच्या 12 नागरिकांनाचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 पेक्षा जण जखमी झाले आहे. या हल्ल्यात भारतातील एक सैनिक शहीद झाला आहे. त्यानंतर सीमाभागातील नियंत्रण रेषेवर अर्लट जारी करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरच नाही तर पाकिस्तानी सीमारेषेवर असलेल्या पंजाबमधील काही जिल्ह्यांवर अलर्ट दिले आहे.
काश्मीर खोऱ्यातील उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही जोरदार तोफगोळ्यांचे आवाज ऐकू येत आहे. परंतु सर्वात जास्त हल्ले जम्मूच्या पूंछ शहरात होत आहे. या भागातील निवासी क्षेत्रे, सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी तोफखान्याचे गोळे पडले. जे १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर पहिल्यांदाच घडले आहे. पूंछ हा जम्मू आणि काश्मीरमधील एक जिल्हा आहे. जो पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. हा जिल्हा नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहे.
जम्मू-काश्मीरमधील या जिल्ह्यांमध्ये गोळीबार
- बांदीपोरा
- बारामुल्ला
- बडगाम
- जम्मू
- कठुआ
- कुपवाडा
- शेपूट
- राजौरी
- सांबा
पंजाबमधील या जिल्ह्यांमध्ये गोळीबार
- अमृतसर
- फाजिल्का
- फिरोजपूर
- गुरुदासपूर
- पठाणकोट
- तरन-तारन
पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि स्थानिक प्रशासनाला २४ तास देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोबाईल नेटवर्क, रुग्णालये, शाळा आणि प्रशासकीय सेवा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच सामान्य नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आणि अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे गुजरातमध्ये हायअलर्ट दिला आहे. जामनगरमधील रिलायन्स तेल रिफायनरी प्रकल्पाला असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षा वाढवली आहे. खावडामध्ये होत असलेल्या सर्वात मोठ्या सोलार एनर्जी पार्कवर सुरक्षा वाढवली आहे. तसेच गुजरातमधील इतर महत्वाच्या प्रकल्पांवर सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.
