AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor PC : भारतावर पुन्हा हल्ले होऊ शकतात, गुप्त माहिती मिळाली होती… भारतीय आर्मीची मोठी माहिती

पहलागममधील निर्घृण हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारताच्या विरोधात हल्ले होतील हे आम्हाला इनपूटद्वारे कळलं होतं. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती मिळाली होती.

Operation Sindoor PC : भारतावर पुन्हा हल्ले होऊ शकतात, गुप्त माहिती मिळाली होती... भारतीय आर्मीची मोठी माहिती
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली ऑपरेशन सिंदूरबद्दल माहितीImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 1:26 PM
Share

भारतात वारंवार दहशतवादी कारवाया करत निष्पापांचा बळी घेणाऱ्या, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना निर्घृणरित्या मारणाऱ्या दहशतावाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले केले. त्यामध्ये 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर सेनेकडून महत्वाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. भारतावर आत्तापर्यंत झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओने पीसीची सुरुवात झाली. त्यात पहलगाममधील हल्ला देखील दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते. गेल्या दशकभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 350 भारतीयांचा मृत्यू झाला आणि शेकजो जखमी झाल्याचे व्हिडीओत नमूद करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती इनपूटद्वारे आम्हाला मिळाली होती, अशी अत्यंत महत्वाची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.

22 एप्रिल हल्ल्याच्या मास्टरमाइंडला धडा शिकवायचा होता

विक्रम मिस्री यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थितांना ऑपरेशन सिंदूरबद्दल संपूर्ण माहिती दिली. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला क्रूर होता, दहशतवाद्यांनी अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. एका समूहाने टीआरएफने जबाबदारी घेतली आहे. ही संघटना तोयबाशी संबंधित असल्याचे नमूद केले. या हल्ल्यानंतर भारतात आक्रोश होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध तोडले, काही निर्णय घेतले. त्यानंतर 22 एप्रिल हल्ल्याच्या मास्टरमाइंडला धडा शिकवण्याचं ठरवलं.

भारतावर पुन्हा हल्ले होऊ शकतात, गुप्त माहिती मिळाली होती.

मात्र पहलागममधील निर्घृण हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारताच्या विरोधात हल्ले होतील हे आम्हाला इनपूटद्वारे कळलं होतं. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे हे रोखणं आवश्यक होतं. त्यामुळे आज मध्यरात्री भारताने त्याला चोख उत्तर दिलं आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती. भारतात अतिरेकी पाठवण्यावर रोख लागण्यासाठी ही कारवाई होती, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केलं.

साजिद मीरचं प्रकरण या अतिरेक्याला पाकिस्तानने मृत घोषित केलं होतं. पण आंतरराष्ट्रीय दबावानंतर तो जिवंत असल्याचं आढळून आलं. यावरून पाकिस्तान काय करतो हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.