Aligarh Crime : अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणाला चाकूने भोसकले, पीडितेच्या आईचा संताप अनावर

कामरान याचे परिसरातील एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब त्या मुलीची आई शकीला यांना समजली होती. त्यांनी मुलीची अब्रू वाचवण्यासाठी कामरानची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीशी संबंध ठेवले. या रागातून आरोपी शकीला हिने तिच्या साथीदारांसह कामरानला परिसरातील सोलर प्लांटजवळ बोलावले आणि तिथे त्याला जीवे मारले.

Aligarh Crime : अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणाला चाकूने भोसकले, पीडितेच्या आईचा संताप अनावर
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:00 AM

अलिगढ : मुलीची वारंवार छेड काढून तिला मानसिक त्रास देणाऱ्या तरुणाला पीडित मुलीच्या आईने चाकूने भोसकून ठार (Stabbed) केले. मुलीच्या आईचा संताप अनावर झाल्याने तिने आपल्या मित्रांच्या मदतीने युवकाचा काटा काढला. अलीगढमध्ये 2 दिवसांपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईने हत्येचा कट रचल्याचा उलगडा अलिगढ पोलिसांच्या तपासात झाला आहे. आपल्या मुलीचे आणि हत्या (Murder) झालेल्या तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीच्या आईने हा पद्धतशीर कट रचला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह एकूण सहा आरोपीना अटक केली आहे. तसेच त्यांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. आरोपींची तुरुंगात रवानगी झाली आहे. (Out of anger at the immoral relationship, the young man was stabbed in aligarh)

मुलीचा नाद सोडण्याबाबत समजूत काढली होती, पण…

सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिरदोस नगर-अमध्ये राहणाऱ्या कामरान नावाच्या तरुणाची ही हत्या झाली. कामरान याचे परिसरातील एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब त्या मुलीची आई शकीला यांना समजली होती. त्यांनी मुलीची अब्रू वाचवण्यासाठी कामरानची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीशी संबंध ठेवले. या रागातून आरोपी शकीला हिने तिच्या साथीदारांसह कामरानला परिसरातील सोलर प्लांटजवळ बोलावले आणि तिथे त्याला जीवे मारले. पद्धतशीर कट करून तरुणाला चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमागील कारणाचा उलगडा करण्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर सतत दबाव टाकला जात होता.

खबऱ्याकडून मिळाली हत्याकांडाच्या कटाची माहिती

तरुणाच्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात आले होते. या पथकाला रात्री उशिरा खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीवरून हे हत्याकांड एका महिलेने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. त्यावेळी महिलेने स्वतःच हत्या केल्याची कबुली दिली. हत्या झालेला तरुण तिच्या मुलीचा विनयभंग करायचा, याच रागातून तरुणाला चाकूने भोसकल्याचे आरोपी महिलेने सांगितले. या हत्येप्रकरणी कामरानच्या कुटुंबीयांनी 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या तपासादरम्यान मुख्य सूत्रधार पीडित महिलेची आई असल्याचा खुलासा झाला. अटक आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. (Out of anger at the immoral relationship, the young man was stabbed in aligarh)

इतर बातम्या

Supreme Court : भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Solapur Crime : सोलापुरातील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा; महिलेला जीवे मारण्याचाही केला प्रयत्न

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.