एमआयएमची भाजपला अशी ही गुगली..क्लिन बोल्ड करणार की..काटशह देण्यात रनआऊट होणार..

असदुद्दीन ओवेसी यांनी दानिलिमडा विधानसभा मतदारसंघातून कौशिका बेन परमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच एआयएमआयएमने आगामी निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार उभा केला आहे.

एमआयएमची भाजपला अशी ही गुगली..क्लिन बोल्ड करणार की..काटशह देण्यात रनआऊट होणार..
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 5:11 PM

नवी दिल्लीः आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक पक्षांनी आता कंबर कसली आहे. केंद्रात आणि सत्तेत असणाऱ्या भाजपसह इतर पक्षांनी वेगवेगळ्या राज्यात रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुजरातमधील (Gujrat Election 2024) आगामी विधानसभा निवडणुकीमुळेही सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये विशेषत: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुलने (AIMIM) निवडणूक प्रचारात वेग घेतला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आताच त्यांच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर केली असल्याने गुजरातमधील निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे.

त्याचबरोबर या तीन उमेदवारांबरोबरच त्यामध्ये एक हिंदू उमेदवारही असल्याने एआयएमआयएमच्या उमेदवारांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी दानिलिमडा विधानसभा मतदारसंघातून कौशिका बेन परमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच एआयएमआयएमने आगामी निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार उभा केल्याचेही दिसून येत आहे.

एआयएमआयएमने कौशिका बेन परमार तसेच गुजरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला यांना जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर इम्रान खेडावाला हे या जागेवरून काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

या मतदार संघात मुस्लिम-दलित बहुसंख्य असल्याने या जागेवर साबीर काबलीवालाना उमेदवारी जाहीर झाली असल्याने या निवडणुकीत ओवेसींना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

एआयएमआयएम पक्षाकडून दानिलिमडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कौशिका बेन परमार या अहमदाबादच्या महिला विभागाच्या प्रमुख आहेत.

आता त्याच गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. सध्या दाणीलिमडा विधानसभा मतदारसंघातून शैलेश परमार हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सध्या या विधानसभेत मुस्लिम आणि दलित मतांची संख्या जास्त असून ही विधानसभा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

विशेष म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे. मागील निवडणुकीतही काँग्रेसने गुजरातमध्ये चांगलीच कामगिरी केली होती.

एआयएमआयएम पक्षाने सुरतच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून वसीम कुरेशी यांनी पक्षाकडून तिसरी उमेदवारी जाहीर केली आहे. ओवेसी यांनी आता आपल्या पक्षाकडून वेगवेगळे प्रयोग करायला चालू केले आहे.

नुकताच ओवेसी यांच्या पक्षाने मध्य प्रदेशमधील महानगरपालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. तिथे पहिल्यांदाच जबरदस्त कामगिरी केली होती, आणि अनेक नगरसेवकही निवडून आले आहेत.

ओवेसी यांच्याकडून राजकीय प्रयोग करण्यात येत असले तरी यूपीच्या विधानसभेत मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. त्यामुळे या परिस्थितीतही ओवेसींनी गुजरात आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पक्षाच्या रणनीतीनुसार निवडणूक लढवण्याची तयारी सुरू ठेवली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.