Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे.

Padma Award 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान
पद्म पुरस्कार
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:01 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

उद्या 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म विभूषण पुरस्कार :

सीडीएस जनरल बिपीन रावत (मरणोत्तर) प्रभा अत्रे – कला कल्याण सिंह (मरणोत्तर) राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

पद्म भूषण पुरस्कार :

सायरस पुनावाला – व्यापार आणि उद्योग नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग सत्या नडेला सुंदर पिचाई गुलाम नबी आझाद

पद्मश्री पुरस्कार :

बाळाजी तांबे (मरणोत्तर) विजयकुमार डोंगरे सुलोचना चव्हाण नीरज चोप्रा डॉ. हिम्मतराव बावस्कर सोनू निगम अनिल राजवंशी भिमसेन सिंगल

इतर बातम्या :

Maharashtra College Reopen : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, कॉलेजबाबत नवे आदेश काय?

BMC Election 2022 : ‘कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल’, महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.