पाकिस्तान, चीन पाहतच राहिले, अमेरिकेमधून भारतासाठी मोठी घोषणा
यावर्षीच्या Google I/O चं मुख्य वैशिष्ट म्हणजे तिथे भारताला केंद्रबिंदू ठेवून प्रोडक्ट्स तयार करण्यात आले आहेत. भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन गुगलने आपले नवे प्रोडक्ट्स तयार केले आहेत.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 10:30 वाजता Google I/O 2025 ला सुरुवात झाली आहे. 20 आणि 21 मे असा दोन दिवसांचा हा इव्हेंट असणार आहे. पहिल्या दिवशी गुगलने AI मॉडल आणि स्मार्ट ग्साल सारख्या काही प्रोडक्ट्सची झलक दाखवली, यातील काही प्रोडक्ट्स हे युजरच्या वापरासाठी लगेच खुले करण्यात आले आहेत, तर काही प्रोडक्ट्स वर अजून काम चालू आहे, असे प्रोडक्ट्स फक्त सध्या डेव्हलपर्सच वापरू शकणार आहेत.
यावर्षीच्या Google I/O चं मुख्य वैशिष्ट म्हणजे तिथे भारताला केंद्रबिंदू ठेवून प्रोडक्ट्स तयार करण्यात आले आहेत. भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन गुगलने आपले नवे प्रोडक्ट्स तयार केले आहेत. तसेच ज्यांनी हे प्रोडक्ट्स बनवले आणि सादर केले त्या टीममध्ये देखील मोठ्या संख्येनं भारतीय तज्ज्ञांचा समावेश आहे.दुसरीकडे या इव्हेंटमध्ये चीन आणि पाकिस्तानसाठी कोणतीही गोष्ट खास नव्हती, पहिल्या दिवशी या दोन देशांबाबत ईव्हेंटमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.
गुगलने आपल्या या कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे भारत ही आपल्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याची कबुलीच दिली आहे. याची झलक गुगलकडून सादर करण्यात आलेल्या एआय मॉडेलमध्ये आणि स्मार्ट ग्लासेसमध्येही दिसून आली. गुगलने आपल्या एआय मॉडेल्सना हिंदीसारख्या भारतीय भाषांमध्ये प्रशिक्षित केलं आहे. तसेच स्मार्ट ग्लासेस आणि जेमिनी सारख्या प्रकल्पांमध्ये देखील भारतालाच केंद्रबिंदू ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे या इव्हेंटमधून चीन आणि पाकिस्तानच्या हाती फार काही लागलेलं नाहीये.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र या काळात चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं देखील समोर आलं, दुसरीकडे आता चीनने या संदर्भात युटर्न घेतला आहे, आम्ही पाकिस्तानला कोणतीही मदत केली नसल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही देश आमच्यासाठी समान असल्याचंही चीनने म्हटलं आहे. आम्ही दोन्ही देशांना सयंम ठेवण्याचं आवाहन करतो असंही चीनने म्हटलं आहे.