Udaipur Murder Case : उदयपूरमधील हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शन, रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद दावत-ए-इस्लामशी संबंधित

रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद दोघेही पाकिस्तान आणि अरब देशातील लोकांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलमध्ये पाक आणि अरब देशातील नंबर आढळले असून पाकिस्तानातील नंबरवर दोघांचे सर्वाधिक बोलणे व्हायचे, असा दावा गृह राज्यमंत्री राजेंद्र सिंह यादव यांनी केला. त्यांनी कराचीत प्रशिक्षण घेतल्याचा दावाही राज्यमंत्री यादव यांनी केला आहे.

Udaipur Murder Case : उदयपूरमधील हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शन, रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद दावत-ए-इस्लामशी संबंधित
उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येचे 26/11 कनेक्शन
Image Credit source: Google
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 29, 2022 | 6:52 PM

उदयपूर : उदयपूरमधील तरुणाच्या हत्येचे कनेक्शन (Murder Connection) पाकिस्तानशी जोडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 8 ते 10 मोबाईल नंबर ट्रेस केले आहेत, त्यांचे लोकेशन पाकिस्तानातून भारतात दाखवत आहे. रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद हे दोघेही या क्रमांकांवर सतत बोलत होते. या धक्कादायक खुलाशानंतर गुप्तचर यंत्रणाही हैराण झाली आहेत. दोघेही दावत-ए-इस्लाम (Dawat-e-Islam) नावाच्या पाकिस्तानी संघटनेशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे.

रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद दोघेही पाकिस्तान आणि अरब देशातील लोकांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलमध्ये पाक आणि अरब देशातील नंबर आढळले असून पाकिस्तानातील नंबरवर दोघांचे सर्वाधिक बोलणे व्हायचे, असा दावा गृह राज्यमंत्री राजेंद्र सिंह यादव यांनी केला. त्यांनी कराचीत प्रशिक्षण घेतल्याचा दावाही राज्यमंत्री यादव यांनी केला आहे. दोघांनी 2014-15 मध्ये सुमारे 15 दिवस प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानमधील आकाच्या बुलाव्यानंतर दोघेही नेपाळमार्गे तेथे गेले.

उदयपूरमधील तरुणांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी उदयपूरमध्ये मंगळवारी कन्हैयालाल नामक तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. तालिबानी पद्धतीने कन्हैयालाल याला मारण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कन्हैयालाल याची हत्या केल्यानंतर यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून आपले इरादे स्पष्ट केले. एनआयएच्या तपासात घौस आणि रियाझ यांच्या पाकिस्तानी कनेक्शनचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. या दोघांनीही कराचीहून परतल्यानंतर उदयपूरमधील तरुणांना भडकावण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनात द्वेष भावना तीव्र केली. एनआयएच्या पथकाने कन्हैयालालचा उदयपूर येथील कारागीर राजकुमार याचीही चौकशी केली. एनआयएच्या पथकाने त्याच्या घरी व दुकानात जाऊन चौकशीही केली.

कन्हैयालालची हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय

उदयपूरमधील कन्हैयालालची हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघांनी मिळून दहशत पसरवायची होती. रियाझ पाकिस्तानातील कराची येथील मौलानाच्या संपर्कात होता. कराचीहून परतल्यानंतर रियाझ आणि गौस मोहम्मद यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले होते. ग्रुपच्या माध्यमातूनच रियाझ प्रक्षोभक व्हिडिओ पाठवून ब्रेन वॉश करत होता. दोघे मिळून उदयपूर आणि आसपासच्या भागात कट्टर समर्थक तयार करत होते. या लोकांनी मोठ्या प्रमाणात तरुणांना आपल्या ग्रुपशी जोडले आहे. (Pakistan connection to the Udaipur murder case, linked to Riaz Jabbar and Gauss Mohammad Dawat-e-Islam)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें