AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा थेट हात, भारताने सादर केले पक्के पुरावे ! संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे

पहलगाम अतिरेकी हल्ल्या संदर्भातील सर्व तांत्रिक आणि मानवी खबऱ्यांमार्फत मिळालेले पुरावे भारताने जगासमोर मांडल्याने पाकिस्तानची चांगली तंतरली आहे. आधी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या TRF नंतर आंतरराष्ट्रीय दबावाला घाबरुन नांगी टाकली आहे.

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा थेट हात, भारताने सादर केले पक्के पुरावे ! संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे
india war
| Updated on: Apr 27, 2025 | 7:54 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी सकाळी ( २२ एप्रिल २०२५ ) झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानाच्या असलेल्या रोल संदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाई सुरु केली आहे. भारताने परदेशी सरकारांच्या समोर तांत्रिक आणि मानवी खबऱ्यांबाबत मिळालेले गुप्तचर पुरावे सादर केले आहेत. यातून या मागे पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांचा थेट रोल असल्याचे पक्के पुरावे भारताने सादर केले आहेत.

पाकिस्तानी कनेक्शन उघड

भारतीय तपास यंत्रणांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटवली आहे. तपासात या हल्ल्यात सामील अतिरेक्यांचा थेट संबंध ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (TRF) बरोबर असल्याचे उघडकीस आले आहे. TRF ही संघटना लष्कर ए तैयबाशी संबंधित शाखा आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्समध्ये या अतिरेक्यांचे सिग्नल पाकिस्तानच्या दोन ठिकाणांशी जुळलेले आहेत.

PM मोदी यांनी 13 राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसातच अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जपान, इस्रायल, इटली, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, नेपाळ, मॉरीशस, डच आणि ऑस्ट्रेलिया सारख्या १३ देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आणि भारताला पाठींबा दिला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमेटीक अधिकाऱ्यांशी संवाद साधात भारताची बाजू मांडली आहे.

भारताची ताबडतोड कार्रवाई

सिंधू पाणी करार रद्द: आता पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही असा इशारा केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी दिला आहे.

राजनैतिक संबंध तोडले: पाकिस्तानशी राजनैतिक संबंध आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.

व्हिसा सेवा रद्द केल्या : पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ प्रभावाने निलंबित करीत, पाकिस्तानी हिंदूंना राहण्याची सूट दिली आहे.

नियंत्रण रेषेवर प्रत्युत्तर : भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

भारताचा संदेश: “पर्यटक संपूर्ण सुरक्षित ”

दिल्लीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी 30 हून अधिक देशांच्या डिप्लोमेटीक अधिकाऱ्यांशी भेट घेत भारतात परदेशी पर्यटक संपूर्ण सुरक्षित असल्याचे आश्वस्त केले आहे. अमेरिका आणि ब्रिटेनने जारी केलेल्या पर्यटकांच्या सूचनांना भारताने “अनावश्यक आणि अतिशयोक्तिपूर्ण” म्हटले आहे.

संपूर्ण जगाचा भारताला पाठींबा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला “भयानक” असल्याचे म्हटलं आहे आणि भारत आणि पाकिस्तान संवादाद्वारे हा प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी इराण आणि सौदी अरेबियाने दाखवली आहे. फ्रान्स, इस्रायल, जपान, इटलीसह अनेक देशांनी दहशतवादाविरुद्ध भारतासोबत आम्ही उभे आहोत असे आश्वासन दिले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.