AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War Situation : हाच भारत-पाकिस्तानमधला मोठा फरक, नुकसान झाल्यानंतर पाकडे आले मूळ औकातीवर

India Pakistan War Situation : भारत आणि पाकिस्तानमध्ये स्थापनेपासूनच मोठा फरक राहिला आहे. आता युद्धसदृश्य परिस्थितीत हा फरक अधिक प्रखरपणे दिसून आलाय. भारताकडून मोठ नुकसान झाल्यानंतर पाकिस्तान आपल्या मूळ औकातीवर आला आहे. त्यांनी जे केलय ते लोकशाहीला धरुन नाहीय.

India Pakistan War Situation : हाच भारत-पाकिस्तानमधला मोठा फरक, नुकसान झाल्यानंतर पाकडे आले मूळ औकातीवर
IAF Image Credit source: X/@IAF
| Updated on: May 10, 2025 | 1:21 PM
Share

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये स्थापनेपासून मोठा फरक राहिला आहे. दोन्ही देशांचे स्वभाव, विचार आणि वृत्ती यामध्ये मोठ अंतर आहे. सध्या पाकिस्तानच्या दहशतवाद प्रिय धोरणांमुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच काळात दोन्ही देशांमधला लोकशाही विचारातला मोठा फरक दिसून आला आहे. भारताने लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे, तर पाकिस्तानात सैन्याने बसवलेलं सरकार आहे. पाकिस्तानातल शरीफ सरकार हा नावापुरता लोकशाहीचा चेहरा आहे. प्रत्यक्ष आता वेळ आली, त्यावेळी फरक स्पष्टपणे दिसून आलाय.

पाकिस्तानने 9 आणि 10 मे च्या रात्री भारताची राजधानी दिल्लीला फतेह मिसाइलने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमने त्यांचा हल्ला उधळून लावला. फेतह मिसाइल हवेतच पाडण्यात आलं. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी श्रीनगर एअर बेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण इंडियन एअर फोर्सने त्यांचा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन फायटर जेट्स पाडले.

दृश्य दाखवण्यास बंदी घातली

भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम उडवली तसच त्यांचे चार एअरबेस मिसाइल हल्ल्यात नष्ट केले. आता पाकिस्तानी सैन्य भारतीय हल्ल्यात झालेलं नुकसान लपवण्याच्या रणनितीवर काम करत आहे. पाकिस्तानी मीडिया आपल्या इथे झालेल्या नुकसानीच्या बातम्या कव्हर करत नाहीय. भारतीय हल्ल्याशी संबंधित कोणत्याही बातमीच पाकिस्तानी मीडियामध्ये प्रक्षेपण होत नाहीय. पाकिस्तानी सैन्याने तिथल्या मीडियावर भारताच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची दृश्य दाखवण्यास पूर्णपणे प्रतिबंध घातला आहे.

पाकिस्तानी सैन्याच सोशल मीडियावर काय आव्हान?

पाकिस्तानी सैन्याशी संबंधित अकाऊंटसनी यूजर्सना सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्याच अपील केलय. सोबतच टाकलेले फोटो हटवायला सांगितले आहेत.

याउलट भारताची भूमिका

याउलट भारताने आज पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या हल्ल्यात जे नुकसान झालं, त्याची माहिती सुद्धा दिली. सीमेवर पाकिस्तानकडून जो गोळीबार, बॉम्बफेक सुरु आहे. तिथलं कव्हरेज करण्याची भारतीय पत्रकारांना परवानगी आहे. भारतीय चॅनल्सवर ते दाखवलं सुद्धा जात आहे. पण याउलट पाकिस्तान वागत आहे. हाच भारत आणि पाकिस्तानमधला मोठा फरक आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड