AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने डागल्या मिसाइल्स, भारताने हाणून पाडल्या

पंजाबमधील अमृतसरमधील चार गावांमध्ये पाकिस्तानी मिसाइलचे तुकडे सापडले. तसेच काही जळालेले अवशेषही आढळले आहेत

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने डागल्या मिसाइल्स, भारताने हाणून पाडल्या
Pakistan attackImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 08, 2025 | 2:53 PM
Share

भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने अमृतसरमध्ये मिसाईल हल्ला केला. पण भारताने हा हल्ला हाणून पाडला. बुधवारी मध्यरात्री अमृतसरमधील जेठूवाल, पंधेर खुर्द, मक्खनविंडी आणि दुधाला गावांमध्ये स्फोटांच्या आवाजानंतर पाकिस्तानी मिसाइलचे तुकडे सापडले. यासोबतच काही जळालेले अवशेषही आढळले आहेत.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. तो सीमेवर सातत्याने गोळीबार करत आहे. भारतीय लष्कर त्याच्या प्रत्येक कृत्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. प्रत्येक आघाडीवर पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या आणखी एका कटाचा बुधवारी पर्दाफाश झाला. खरेतर, पंजाबमधील अमृतसरमधील चार गावांमध्ये पाकिस्तानी मिसाइलचे तुकडे सापडले, जे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वाचा: ऑपरेशन सिंदूर यशस्वी, बहावलपूर स्ट्राईकमध्ये मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब ठार

स्फोटांनंतर मिसाइलचे तुकडे सापडले

बुधवारी मध्यरात्री जेठूवाल, पंधेर खुर्द, मक्खनविंडी आणि दुधाला गावांमध्ये स्फोटांच्या आवाजानंतर पाकिस्तानी मिसाइलचे तुकडे सापडले. यासोबतच काही जळालेले अवशेषही आढळले आहेत. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

पोलिसांनी लष्कराला दिली माहिती

स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती भारतीय लष्कराला दिली. त्यानंतर लष्कराच्या तुकड्या हे अवशेष तपासासाठी आपल्यासोबत घेऊन गेल्या. अशी शंका आहे की, पाकिस्तानने अमृतसरला लक्ष्य करण्यासाठी डागलेली ही रॉकेट्स आणि मिसाइल्स भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली, त्यानंतर त्यांचे अवशेष शेतांमध्ये पडले. प्रशासन सातत्याने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत आहे.

अमृतसरमध्ये सुरू होती मॉक ड्रिल

पाकिस्तानने हे कृत्य केले तेव्हा अमृतसरमध्ये मॉक ड्रिल सुरू होती. संपूर्ण शहराची वीज खंडित करण्यात आली होती. यावेळी अमृतसरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून संदेश जारी करण्यात आला की, लोकांनी घाबरू नये, प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआउट केले आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये आणि बाहेर एकत्र जमू नये. तसेच, दिवे बंद ठेवावेत आणि मोबाइल फोनही बंद ठेवावेत.

पुंछमध्ये गोळीबार

पाकिस्तान सीमेवर सातत्याने गोळीबार करत आहे. पुंछ सेक्टरमध्ये त्याच्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 59 जण जखमी झाले. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, जखमींपैकी 44 जण पुंछमधील आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील अनेक क्षेत्रांमध्ये जोरदार गोळीबार करत आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कर प्रत्युत्तर देत आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, “7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानी लष्करी चौक्यांनी कोणत्याही कारणाशिवाय जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील कुपवाडा, बारामुला, उरी आणि अखनूर या क्षेत्रांमध्ये छोट्या आणि मोठ्या शस्त्रांनी गोळीबार केला.” अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, भारतीय लष्कराने याला योग्य प्रत्युत्तर दिले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.