AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांदीपुरा व्हायरसची गुजरातमध्ये दहशत, लहान मुलांना धोका; महाराष्ट्रात आढळला होता पहिला रुग्ण

देशात अनेक नवीन व्हायरसमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेक व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाही. असाच एक व्हायरस आहे ज्याचे नाव चांदीपुरा असे आहे. सध्या गुजरातमध्ये या व्हायरसमुळे चार मुलांना मृत्यू झाला आहे. हा व्हायरल पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळला होता.

चांदीपुरा व्हायरसची गुजरातमध्ये दहशत, लहान मुलांना धोका; महाराष्ट्रात आढळला होता पहिला रुग्ण
| Updated on: Jul 16, 2024 | 3:15 PM
Share

कोरोनाचा विषाणू जगभरात पसरल्यानंतर अनेकांना यामुळे जीव गमवावा लागला होता. या व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला होता. करोडो लोकांना याची लागण झाली होती. काही बरे झाले तर ज्यांना इतर आजार होते त्यांना जीव गमवावा लागला होता. या व्हायरसची दहशत अजूनही लोकांमध्ये दिसते. असं असताना आता आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे. या व्हायरसला चंदिपुरा व्हायरस असं म्हणतात. चांदीपुरा व्हायरसची माहिती समोर येताच देशात खळबळ उडाली आहे. देशातील आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात चांदीपुरा व्हायरसमुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकं चिंतेत आहेत.

चार मुलांचा चांदीपुरा विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या विषाणूची लागण झालेल्या दोन बालकांवर हिंमतनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व बालकांचे रक्ताचे नमुने पुष्टीकरणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आले आहेत.

चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?

या व्हायरसचे पहिले प्रकरण महाराष्ट्रात 1966 मध्ये नोंदवले गेले होते. नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची माहिती समोर आली होती. म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले. 2004 ते 2006 आणि 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला होता. चांदीपुरा हा एक आरएनए विषाणू आहे. जो मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो. डासांमध्ये आढळणारा एडिस हा त्याच्या प्रसारास कारणीभूत आहे.

चांदीपुरा विषाणूचा सर्वाधिक परिणाम हा १५ वर्षांखालील मुलांवर होतो.या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. चांदीपुराच्या उपचारासाठी अद्याप कोणतेही अँटी-व्हायरल औषध बनलेले नाही.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?

चांदीपुरा विषाणूची लागण झाली तर रुग्णाला ताप येतो. यात फ्लूसारखी लक्षणे आणि गंभीर एन्सेफलायटीस आहे. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.