आयुर्वेदाच्या मदतीने सेप्सिस आजारावर करता येते मात, पतंजलीचं मोठं संशोधन!
पतंजलीचे हे संशोधन बायोमेडिसीन अँड फार्माकोथेरेपी अकॅडमिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनात सेप्सिस या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं या संशोधनात म्हणण्यात आलंय.

पंतजली संशोधन संस्था ही वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारी मोठी संस्था आहे. या संस्थेने सेप्सिस या आजारवर मोठे संशोधन केले आहे. पतंजलीचे हे संशोधन बायोमेडिसीन अँड फार्माकोथेरेपी अकॅडमिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनात सेप्सिस या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं या संशोधनात म्हणण्यात आलंय.
सेप्सिस आजार नेमका काय आहे?
सेप्सिस हा आजार इन्फेक्शनमुळे होते. या आजारामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. या आजारामुळे शरीरातील वेगवेगळ्या भागावर तसेच ऊतींना (टिश्यू) इजा होते. हा आजार फंगसच्या (बुरशी) संसर्गामुळे होते. पतंजली संशोधन संस्थेने आपल्या या रिसर्चमध्ये आयुर्वेदात फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्सच्या मदतीने या आजारावर विजय मिळवता येऊ शकतो, असे सांगितले आहे.
रिसर्चमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय?
सेप्सिस या आजारत मुत्रपिंडावर परिणाम पडतो. हा आजार झाल्यास मुत्रिपिंडाला रक्तपुरवाठा कमी होतो. या आजारामुळे मुत्रपिंडाच्या ऑक्सिजनेशन प्रक्रियेवरही परिणाम पडतो. वनस्पतींमधील फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्सच्या मदतीने तुम्हाला सेप्सिस आजारावर विजय मिळवता येतो. फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्समुळे सूज कमी होते.फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्स हे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. पतंजलीच्या संशोधनात पॅथोफिजिओलॉजी, बायोमार्कर आणि फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्स यांची भूमिका सविस्तरपणे देण्यात आलेली आहे.
आयुर्वेदाच्या मदतीने सेप्सिस आजारावर विजय मिळवता येऊ शकतो
पतंजलीच्या संशोधनाप्रमाणे सेप्सिस या आजारावर आयुर्वेदिक औषध तसेच औषधी वनस्पती यांच्या मदतीने विजय मिळवता येऊ शकतो, असं सांगितलं आहे. या संशोधनात आलं, क्वेरसेटीन आदी गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. हे घटक अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून शरीरात काम करतात. कर्क्यूमीन, रेसवेराट्रोल, बायकेलिन, क्वेरसेटिन आणि पॉलीडेटिन सेप्सिस यासारखे फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्स मुत्रपिंडाशी संबंधित आजार, संसर्गाला रोकू शकतात, असंही या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय.
याच रिसर्चमध्ये मुत्रिपंडाचे रक्षण करण्याचेही काही उपाय सांगण्यात आले आहेत. सेप्सिस आजार झाल्यानंतर नेफ्रोटॉक्झिक औषधं घेणं टाळलं पाहिजे. गरज असेल तेव्हाच अशा प्रकारची औषधं घेतली पाहिजेत, असं या रिसर्चमध्ये म्हणण्यात आलंय.
दरम्यान पतंजली संशोधन संस्थेच्या या संशोधनाने संर्वांचंच लक्ष वेधलं आहे. या संशोधनात सांगितल्याप्रमाणे फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्स ना भविष्यात औषध म्हणून विकसित करता येऊ शकतं. या औषधाच्या माध्यमातून मुत्रपिंडाच्या आजारावर विजय मिळवता येऊ शकतो. विशेष म्हणजे फायटोकॉन्स्टिट्यूअन्ट्सचा शरीरावर दुष्परिणामही होत नाही, असं या संशोधनात सांगण्यात आलंय.
