AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींची स्तुती करणं पडलं महागात, विद्यापीठाचे विद्यार्थ्याला पीएचडीची पदवी परत करण्याचे फर्मान

उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे विद्यापीठाने माझी पीएचडीची डिग्री परत मागितली आहे.

मोदींची स्तुती करणं पडलं महागात, विद्यापीठाचे विद्यार्थ्याला पीएचडीची पदवी परत करण्याचे फर्मान
Danish Rahim
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 2:08 PM
Share

अलीगड: उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे विद्यापीठाने माझी पीएचडीची डिग्री परत मागितली आहे, असा दावा या पीएचडी प्राप्त विद्यार्थ्याने केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दानिश रहीम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला अलिगड मुस्लिम विद्यापीठाने पीएचडीची डिग्री दिली होती. आता ही डिग्री परत मागितली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी दानिशने केली आहे. दानिशने या दोन्ही नेत्यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मला 9 मार्च 2021 रोजी ही डिग्री देण्यात आली होती. तर माझी सहकारी मारिया नईमला नोव्हेंबर 2020ममध्ये पीएडीची डिग्री देण्यात आली होती. पीएडी मिळून सहा महिने उलटल्यानंतर आम्हाला विद्यापीठाने 4 ऑगस्ट 2021 रोजी एक पत्रं पाठवलं. त्यात आम्हा दोघांना चुकून पदवी देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

22 डिसेंबर रोजी केली स्तुती

मला हे पत्रं आल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. मात्र, 22 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधानांचं कौतुक केल्याचं माझ्या लक्षात आलं. पंतप्रधानांनी अलीगड यूनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. तेव्हा मी त्यांचं कौतुक केलं होतं. मीडियाने माझी मुलाखतही दाखवली होती, असं दानिश म्हणाला.

राईट विंगचा म्हणून संबोधलं

मी पंतप्रधानांची स्तुती केल्यानंतर मला विद्यापीठाकडून चुकीची वागणूक दिली जाऊ लागली. 8 फेब्रुवारी रोजी माझा वायवा होता. त्यापूर्वी मला चेअरमनने बोलवून घेतलं होतं. तू विद्यार्थी आहेस. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबत तू अशी उघडपणे भूमिका मांडणं योग्य नाही. राईट विंगचा माणूस असल्या सारखच तू त्या दिवशी बोलत होता, असं चेअरमन मला म्हणाले होते, असं त्याने सांगितलं.

कोर्टात धाव

त्यावेळी मी चेअरमनला कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर मला डिग्री मिळाली. पण आता चुकून डिग्री दिल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत मी विद्यापीठाला पत्रं दिलं आहे. पण त्यावर अजून काही उत्तर आलं नाही किंवा कार्यवाहीही झाली नाही. त्यामुळे मी नाईलाजाने कोर्टात धाव घेतली आहे. पीएम आणि सीएमलाही पत्रं लिहिलं आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळू नये. विद्यापीठाकडून माझ्याविरोधात षडयंत्रं रचलं जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असंही त्याने सांगितलं.

विद्यापाठाचा खुलासा

दानिशने केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याने भाषा विज्ञान विभागातून एलएएम अभ्यासक्रमासाठी एमए आणि पीएचडी केली आहे. या विभागाकडून भाषा विज्ञानाची पीएचडी डिग्री प्रदान केली जाते. मात्र, त्याने एलएएममध्ये एमए केलं आहे. तर त्यांना एलएएममध्ये पीएचडीची डिग्री मिळायला हवी. चुकून या विद्यार्थ्याला भाषा विज्ञानातील पीएचडी डिग्री देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला डिग्री बदलण्यास सांगितलं आहे, असं विद्यापाठीचे प्रवक्ता शैफी किडवे यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray Discharge | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज, रिलायन्स रुग्णालयातून ‘वर्षा’वर

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’साठी मुंबईत रोड शो चालतो का?; संजय राऊतांचा शेलारांना सवाल

Maharashtra Rains and Weather News LIVE : मुंबईतील पावसामुळं पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेवर परिणाम

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.