AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ऑफरोडिंग करणं बापलेकीला पडलं महागात, गाडी थेट वरून पाण्यात पडली आणि…

मध्यप्रदेशातील इंदुर येथील लोधिया कुंडात एक धक्कादायक घटना घडली. ऑफरोडिंग करत कुंडाजवळ पोहोचलेली गाडी थेट पाण्यात पडली. पण दैव बलवत्तर होतं म्हणून...

Video : ऑफरोडिंग करणं बापलेकीला पडलं महागात, गाडी थेट वरून पाण्यात पडली आणि...
Video : लोधिया कुंडात कार वरून खाली थेट पाण्यात पडली, त्याने क्षणाचाही विचार न घेतली उडी आणि...
| Updated on: Aug 07, 2023 | 9:33 PM
Share

इंदूर : पावसाळ्याचे दिवस असून ठिकठिकाणी नैसर्गिक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक जाताना दिसत आहेत. काही ठिकाणं ही ठरलेली असून लोकं अशा ठिकाणी गर्दी करतात. तर काही लोकांची मस्ती त्यांच्या अंगाशी येते. अनेकदा अनुचित प्रकार घडतात आणि जीवही गमवावा लागतो. मध्य प्रदेशातील इंदुर येथील लोधिया कुंडाजवळ असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ उपस्थित असलेल्या पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुमित मॅथ्यू नावाच्या तरुणाने योग्य वेळी पाण्यात उडी घेतली नसती तर कदाचित बापलेकीच्या जीवावर बेतलं असतं. पण सुमित मॅथ्यू देवासारखा धावून आला आणि दोघांचा जीव वाचला.

सुमित मॅथ्यु याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की लाल रंगाची कार वरून थेट पाण्यात पडली. या कारण बापलेक होती. गाडी खाली पडताना त्यातून तिचे वडील बाहेर पडले आणि थेट पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याचं दिसत आहे आणि ते पाण्यात बुडत होते. तर मुलगी गाडीतच अडकली होती.

“मी एक गाडी वरून खाली पडताना पाहिली. अंकल गाडीतून बाहेर पडले होते पण त्यांची मुलगी गाडीतच अडकली होती.मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा मी पाण्यात उडी घेतली आणि त्या काकांना बाहेर काढलं. काही लोकं तिथे ऑफरोडिंग करत गाडी तेथे आणतात. दोन्ही मुली आणि वडील सुरक्षित आहेत.”, असं देवदूत ठरलेल्या सुमित मॅथ्यू याने सांगितलं.

सुमित मॅथ्यू याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. देवदूतासारखा धावून आल्याने त्याच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अशी कृती करणाऱ्या वडिलांना खडेबोल सुनावले आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा