पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे जाताच तुम्हाला दिसतं तुमचं भविष्य, पण जाण्यास बंदी
तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु या पृथ्वीवर अशी एक जागा आहे, जिथे जाताच तुम्ही तुमचं भविष्य पाहू शकता, मात्र या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जाणून घेऊयात ही जागा नक्की आहे तरी कुठे?

विज्ञानाने माणसाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, विज्ञानामुळे अशा गोष्टी शक्य झाल्या ज्या गोष्टी कधीकाळी फक्त एक कल्पना वाटत होत्या. मात्र अजूनही टाईम ट्रॅव्हल भूत काळात आणि भविष्यकाळात मागे पुढे जाणं माणसाच्या हातात नाहीये, भविष्यात देखील याची शक्यता वाटत नाही. परंतु जगात अशी एक जागा आहे, जिथे जाऊन माणूस हा आपलं भविष्य पाहू शकतो. हा काही नवा शोध नाहीये, तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेलं एक अनोख बेट आहे. या रहस्यमयी जागेचं नाव डायोमीड आयलँड आहे. हे स्थान संपूर्णपणे एक बेट नसून दोन बेटांमध्ये विभागलं गेलं आहे. या आयलँडचं नाव आहे, बिग डायोमीड आणि लिटल डायोमीड. खास गोष्ट म्हणजे या दोन्ही आयलँडमधील अंतर अतिशय कमी आहे. मात्र वेळेतील अतंर हे खूप जास्त आहे.
बिग डायोमीड आणि लिटल डायोमीड यातील अंतर अवघं 4.8 किलोमीटर आहे. मात्र यामधील हेच अंतर माणसाला भविष्य आणि भूतकाळाचा प्रवास घडवून आणते. याचं कारण म्हणजे या दोन डायोमीडमधून जाणारी एका काल्पनिक रेखा. या दोन आयलँडमधून इंटरनॅशनल डेट लाईन गेलेली आहे. ही रेखा उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत जाते. याच रेषेच्या आधावर पृथ्वीवरील तारीख निश्चित केली जाते. ही रेखा ओलंडताच कॅलेंडरमध्ये दिवस बदलतो, आणि माणूस भूतकाळात व भविष्यकाळात चालला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही रविवारी लिटल डायोमीडवर आहात, तुम्ही ही रेखा पार करून बिग डायोमीडवर गेलात तर तिथे सोमवार असतो. त्यामुळेच बीग डायोमीडला Tomorrow Island आणि लिटल डायोमीडला Yesterday Island देखील म्हटलं जातं.
हेच मुख्य कारण आहे, की या जागेला टाइम्स ट्रॅव्हलशी जोडला जातं, डायोमीड आयलँडचा शोध 16 ऑगस्ट 1728 ला डॅनिश -रशियन खलाशी विटस बेरिंग याने लावला होता. 1982 ला अमेरिकेनं ही जागा रशियाकडून खरेदी केली. ही जागा अमेरिकेनं खरेदी केल्यानंतर रशिया आणि अमेरिकेमधील सीमा निश्चित झाल्या. मात्र त्यानंतर अमेरिका आणि रशियामधील संबंध सातत्यानं बिघडतच असल्यानं या ठिकाणी जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.
