नवी दिल्ली: व्यक्तिगत आयुष्यात कितीही संकट आलं तरी काही लोक कर्तव्यनिष्ठेला अधिक महत्त्व देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक आहेत. सकाळी आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा कामाला लागले. शो मस्ट गो ऑन म्हणत त्यांनी बंगालमधील एका कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी मोदी बंगालला जाणार होते. पण जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. पहले मां का फर्ज फिर देश का कर्ज, असं म्हणत त्यांनी बंगाली जनतेची माफीही मागितली. त्यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. मोदी यांनी माफी मागितल्यानंतर सर्वांचीच मनं हेलावून गेली.